Bhandara Rain Update: बळीराजाची चिंता वाढतेय..भंडारा जिल्ह्यात पावसाने फिरविली पाठ

Bhandara News शेतकरी चिंतेत.. भंडारा जिल्ह्यात पावसाने फिरविली पाठ
Bhandara Rain
Bhandara RainSaam tv

शुभम देशमुख 

भंडारा : भंडारा जिल्ह्यात शेतकरी संकटात सापडला आहे. मागील १५ दिवसापासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने (Bhandara) शेतात जमिनीला भेगा पडून धान पीक करपायला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी (Farmer) चिंतेत असून आभाळाकडे नजरा आहे. (Live Marathi News)

Bhandara Rain
Nandurbar News: अवैध वाळू आणि गौण खनिज उपसा; वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई

भंडारा, गोंदिया जिल्हा हा धानाचा कोठार म्हणून ओळखला जातो. येथील ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग राहत असून पावसाळा लागताच शेतकऱ्यांनी धान पीक लागवड केली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही वरुणराजा (Rain) कृपा करेल व धानपिक बहरेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण मागील १५ दिवसापासून पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी लागवड केलेली धान पीक करपत असून शेतीमध्ये मोठं मोठ्या भेगा पडू लागल्याने शेतकरी राजा विवंचनेत सापडला आहे.  

Bhandara Rain
Jalna News: २८ क्विंटल तांदूळ जप्त; हैद्राबादला काळ्या बाजारात विक्रीसाठी तयारी

तर कर्ज वाढेल 

आधीच कसा बसा उसण उधार करून शेतीत धान पीक लागवड केली. मग आता पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांवर आणखी कर्जाचा डोंगर वाढण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळे कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकशान भरपाई द्यावी; अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com