Kalyan News: कल्याण पूर्वेत पोलिस स्टेशन व कर्मचारी वाढवा; मुलीच्या हत्येनंतर भाजप- शिंदे गटाची मागणी

कल्याण पूर्वेत पोलिस स्टेशन व कर्मचारी वाढवा; मुलीच्या हत्येनंतर भाजप- शिंदे गटाची मागणी
Kalyan News
Kalyan NewsSaam tv

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण पूर्वेत गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. एकतर्फी प्रेमातून (Kalyan) मुलीची हत्या झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. यानंतर भाजप (BJP) व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस स्टेशन वाढवून पोलीस कर्मचारी देखील वाढविण्याची मागणी केली आहे. (Tajya Batmya)

Kalyan News
Jalna News: २८ क्विंटल तांदूळ जप्त; हैद्राबादला काळ्या बाजारात विक्रीसाठी तयारी

कल्याण पूर्वेत काही दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाही, तोच एका अल्पवयीन मुलीची दिवसाढवळ्या तिच्या आईसमोर चाकूने वार करीत हत्या करण्यात आल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेनंतर कल्याण शहर हादरले. त्यानंतर राजकीय नेत्यांनी पोलिसांची भेट घेतली. भाजप आणि शिंदे गटाने मोठी लोकसंख्या असलेल्या कल्याण पूर्वेत दोन पोलिस (Police) स्टेशन झाली पाहिजेत. पोलिसांचे मनुष्यबळ वाढविले पाहिजे. रहदारीच्या रस्त्यावर चौकात पोलिसांची गस्त वाढवावी; अशी मागणी केली. तर दुसरीकडे ठाकरे गटाने कल्याण मध्येच नव्हे तर अख्या महाराष्ट्रात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतेय त्यामुळे थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Kalyan News
Bhandara Rain Update: बळीराजाची चिंता वाढतेय..भंडारा जिल्ह्यात पावसाने फिरविली पाठ

या प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी लहान मुलीसोबत जे काही प्रकार घडत आहे. त्याबाबत जनजागृती करणे महत्वाचे आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार केली असती, तर हे प्रकरण या थराला गेले नसते. शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ याना निवेदन देत कोचिंग क्लास, शाळा, कॉलेज या परिसरात बीट मार्शलची गस्त वाढविली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी एक पोलिस नेमावा. तर विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी कल्याण पश्चिमेत जितकी लोकसंख्या आहे. तितकीच लोकसंख्या कल्याण पूर्वेत आहे. कल्याण पश्चिमेत तीन पोलिस स्टेशन आहे. मात्र कल्याण पूर्वेत एकच पोलिस स्टेशन आहे. आणखी एक पोलिस स्टेशन झाले पाहिजे. पोलिसांचे मनुष्यबळही वाढले पाहिजे असे सांगितले. तर ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी केवळ कल्याणमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात शिंदे फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. पत्रकार आणि महिलांवर होणारे ह्ल्ले होत आहे.  त्यानंतर कल्याण पूर्वेतील अल्पवयीन तरुणीची चाकूने झालेली हत्या पाहता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com