Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : पैशाची चणचण भासल्याने गुन्हेगारीकडे वळला; कल्याण रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोरट्याला घेतले ताब्यात

Kalyan News : रिक्षा चालवणे सोडून व्यसनाच्या आहारी गेला आणि जुगार खेळायला लागला. यामुळे त्याच्याजवळ असलेले सर्व पैसे खर्च झाले होते.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: लोकलमधील गर्दी, तिकीट काउंटरवरील गर्दीत संधी साधून प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हातात पैसे नसल्याने मोबाईल चोरी करून त्यांची विक्री करून पैसे मिळवायची सवयीने दिल्ली येथील रहिवासी असलेल्या जोगिंदर कल्याणमध्ये पोहचला होता. 

जोगिंदर लबाना असे या चोरट्याचे नाव असून तो मूळचा दिल्लीचा रहिवासी आहे. जोगिंदर दिल्लीत ट्रेनमध्ये चोरी करायचा आणि त्यानंतर तो (Kalyan) कल्याणमध्ये आला. येथे त्याने काही काळ रिक्षा चालवली, मात्र नंतर तो रिक्षा चालवणे सोडून व्यसनाच्या आहारी गेला आणि जुगार खेळायला लागला. यामुळे त्याच्याजवळ असलेले सर्व पैसे खर्च झाले होते. त्यामुळे त्याला पैशांची चणचण  जाणवू लागली होती. त्यातून पुन्हा चोरीच्या मार्गाकडे वळला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला.

उल्हासनगर येथून घेतले ताब्यात 

पोलिसांना मिळालेल्या खबरीच्या माहितीवर आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कल्याण रेल्वे पोलिसांनी (Railway Police) त्याला उल्हासनगर येथून अटक केली. जोगिंदर लबाना याने अनेक चोऱ्यांची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडुन चार महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

SCROLL FOR NEXT