kalyan News Raju Patil Saam tv
महाराष्ट्र

kalyan News: भाजप- शिंदे गट शिवसेनेबाबत मनसे आमदाराचे मोठे विधान; म्‍हणाले शिवसेनेचाच उमेदवार राहणार

भाजप- शिंदे गट शिवसेनेबाबत मनसे आमदाराचे मोठे विधान; म्‍हणाले शिवसेनेचाच उमेदवार राहणार

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : समस्यांपासून लक्ष वळवण्यासाठी भाजप शिंदे गटाची ही खेळी सुरू आहे. त्‍यांची युती शंभर टक्के होणार व (Kalyan) कल्याण लोकसभेत शिवसेनेचा (Shivsena) उमेदवार राहणार हे सर्व पुन्हा एकत्र काम करणार असं विधान मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना केले. (Live Marathi News)

डोंबिवलीत मनसे पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील आले होते. शिंदे गटातील पाच मंत्र्यांना गच्छंती करण्यासाठी भाजप दबाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी (BJP) भाजपसह शिंदे गटाला टोला लगावला.

काही दिवसांपूर्वी आलेल्या सर्व प्रत्येक सर्वेत शिंदे गटाला कमी स्थान दिले. जनसामान्यांचे समस्यांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चाललेली ही खेळी आहे. २०१५ ला कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजप भांडत होते. नंतर पुन्हा युती केली, हे एकच थाळीचे चट्टेपट्टे आहेत. एका पोलीस (MNS) अधिकाऱ्यावरून एवढे राजकारण करण्याची गरज नाही. गृह खाते यांच्याकडे आहे बदली करायचे आहे तर ते करू शकतात. हा कुठेतरी लक्ष वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथे पुन्हा शिवसेनेचा उमेदवार देणार आणि शिवसेना भाजप सर्वजण त्याचा प्रचार करणार असे विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

हातात बेड्या अन् प्रचंड राग...पंतप्रधानांच्या घराबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाची दृश्ये, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT