Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : कल्याणमध्ये सोसायटी घोटाळा; कॉमन स्टिल्ट पार्किंग विक्री प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल

Kalyan News : कल्याणमधील सोसायटी घोटाळ्याच्या प्रकरणामुळे कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. १३ जणांवर गुन्हा दाखल असला तरी पुढील सुनावणीला याचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rajesh Sonwane

संघर्ष गांगुर्डे

कल्याण : कल्याणच्या चार्म्स हेरिटेज C2 को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. सोसायटीच्या कॉमन स्टिल्ट पार्किंग स्पेसची बेकायदेशीर विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तब्बल १३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सोसायटीतील रहिवाश्यांचा देखील समावेश आहे. 

कल्याणच्या चार्म्स हेरिटेज C2 को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत घोटाळा उजेडात आला आहे. ही घटना जानेवारी २०२३ मध्ये समोर आली आहे. या प्रकरणी सोसायटीतील एक सदस्य मनीष कुमार यांनी खडकपाडा पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, पोलिसांना नेमका गुन्हा कोणता? हे समजत नसल्याने कारवाई लांबली होती. अखेर जून २०२४ मध्ये LEXWISSE LEGAL या विधी फर्मच्या मदतीने खाजगी फौजदारी तक्रार दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आली.

न्यायालयाकडून १३ जणांना समन्स 

यानंतर म्हणजे १८ सप्टेंबर २०२५ रोजी कल्याण न्यायालयाने दखल घेत १३ आरोपींना समन्स बजावले. त्यापैकी १२ आरोपी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने सुनावणी करून त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जामिनावर सोडले. या प्रकरणातून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अधोरेखित झाला असून सोसायटीतील कॉमन एरिया विक्री किंवा खरेदी करता येत नाही. कारण हा प्रत्येक सदस्याचा अविभाज्य हक्क असतो. अशा प्रकारे सामाईक हक्कांवर गदा आणणे हे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा मानला जातो.

सोसायटीतील ११ सदस्यांचा समावेश 

दरम्यान या प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या १३ जणांमध्ये सोसायटीच्या व्यवस्थापन समितीतील ११ सदस्य, तसेच विक्रेता आणि खरेदीदार यांचा समावेश आहे. आरोपानुसार, सर्व आरोपींनी संगनमत करून सोसायटीच्या सामाईक जागेचा गैरवापर करत स्वतःचा फायदा करून घेतला आणि सदस्यांचे नुकसान केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade Apple Juice: घरच्या घरी फक्त २ मिनिटांत सफरचंदचा रस कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update : डॉ.गौरी पालवे यांच्यावर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच पार पडले अंत्यसंस्कार...

आत्महत्यापूर्वी डॉ. गौरी कुठे होत्या? डान्स प्रॅक्टिसच्या काही तासानंतर का जीव दिला? वडिलांकडून मोठी माहिती उघड

PM Kisan Yojana: ५ दिवस झाले, अजूनही पीएम किसानचा हप्ता आला नाही? अशी करा तक्रार, लगेच येतील ₹२०००

Today Gold Rate : सोनं खरेदीचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव; 24k, 22k च्या दरात मोठा बदल

SCROLL FOR NEXT