Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: गुंगीचे औषध देवून कारमधून गायींची तस्करी; एक आरोपी ताब्‍यात, पाच फरार

गुंगीचे औषध देवून कारमधून गायींची तस्करी; एक आरोपी ताब्‍यात, पाच फरार

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख

कल्याण : कल्याण रेतीबंदर रोड परिसरात काही गाईंना आणण्यात आल्याची माहिती कल्याण (Kalyan) बाजार पेठ पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच तत्काळ बाजारपेठ (Police) पोलिसांनी छापा टाकत एका आरोपीला अटक केली. तर २ गायींची सुटका केली. सोयाब निजाम असे अटक आरोपीचे नाव आहे. (Breaking Marathi News)

ग्रामीण भागात रानामध्ये चारा खात असलेल्या गाईला आणि बैलाला गुंगीचे इंजेक्शन मारायचे. ही जनावर खाली पडल्यानंतर त्यांना एका चादरीमध्ये गुंडाळून पाच ते सहा जण मिळून त्यांना गाडीच्या डिक्कीमध्ये भरून गाईंची वाहतूक करायचे. कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता धारदार शस्त्राने निर्दयीपणे गोवंश जनावराची हत्या करत त्यांचे अवयव विकायचे. अशाच प्रकारे सुरू असलेल्‍या तस्‍करीबाबत पोलिसांना माहिती मिळाल्‍यानंतर कल्याण बाजार पेठ पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.

पाच साथीदार फरार

या दरम्यान छाप्यात पाच आरोपी इब्राहिम इस्माईल माजीद उर्फ ​​पापा हड्डी, अरबाज, गोरू, मच्छी, आवली, बर्क्या असे त्याचे पाच साथीदार मात्र निसटले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करत एक रिक्षा व दोन हातगाड्या, लोखंडी रॉड, हुक, सुतळी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT