Kalyan Dombivili News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: सिम कार्ड फ्रॉड उघड; डोंबिवली स्टेशन परिसरात पोलिसांचा छापा, महिला ताब्यात

सिम कार्ड फ्रॉड उघड; डोंबिवली स्टेशन परिसरात पोलिसांचा छापा, महिला ताब्यात

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख

कल्याण : डोंबिवलीत पोलिसांनी सिम कार्ड फ्रॉड उघडकीस आणले आहे. स्टेशन परिसरातील दुकानाचे अधिकृत कोड (Dombivili) वापरत रस्त्यावर सिम कार्डचे स्टॉल लावून सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत सिम कार्डची विक्री होत होती. या प्रकरणी (Police) पोलिसांनी हर्षदा पराडकर या महिलेला अटक केली आहे. (Latest marathi News)

सिम कार्ड घोटाळ्याची एक धक्कादायक घटना डोंबिवलीत स्टेशन परिसरात उघडकीस आली आहे. डोंबिवलीत स्टेशन परिसरात दुकानाचे अधिकृत कोड वापरत रस्त्यावर सिम कार्डचे स्टॉल लावून सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत सिम कार्डची विक्री होत असल्याची माहिती डोंबिवलीचे एसीपी सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार डोंबिवली एसीपी सुनील कुराडे यांच्या टीमने स्टेशन परिसरात छापा टाकत हर्षदा पराडकर नावाच्या महिलेला ताब्यात घेतले. महिलेची अधिक चौकशी केली असता ही महिला डोंबिवली पूर्वेतील गणेश इलेक्ट्रिक शॉपचे डीलर कोड वापरून स्टेशन परिसरात सिमकार्डचे स्टॉल लावून सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांच्या आधारकार्डवर वेगवेगळे फोटो लावून बनावट आधारकार्ड तयार करत होती.

ऑनलाइन फसवणूकीसाठी वापर

बनावट आधारकार्डच्या (Aadhar Card) आधारे नवीन सिमकार्ड ॲक्टिव्ह करत ते सिमकार्ड जास्त पैशात विक्री करत होती. सदर सिमकार्ड ऑनलाइन फसवणूक धमकी व सोशल मीडियावर विविध गुन्हे करण्यासाठी वापरले जायचे. डोंबिवली पोलिसांनी या महिलेला बेड्या ठोकत या महिलेकडून १७० जणांच्या नावाने सिम कार्ड काढल्याचे माहिती उघडकीस आणली आहे. अजून तिने किती लोकांना सिमकार्ड विकले याची माहिती पोलीस घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT