Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : बोगस मतदार व यादीत घोळ; शिवसेना उबाठा आक्रमक, बोगस मतदाराना शिवसेना स्टाइलने धडा शिकविण्याचा इशारा

Kalyan News : बोगस नावे जोडून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे बोगस नोंदी करणाऱ्या आणि मतदार यादीत फेरफार करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी ठाकरे गटाने केली.

Rajesh Sonwane

संघर्ष गांगुर्डे

कल्याण : कल्याण तालुक्यातील खडवली ग्रामपंचायत हद्दीतील काही बुथमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नावे दाखल करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उबाठा गटतर्फे करण्यात आला आहे. यासंदर्भात संबंधितांवर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करण्याची मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख आल्पेश भोईर यांच्या नावाने कल्याण तालुका पोलिस ठाण्यात देण्यात आले. दरम्यान बोगस मतदारांना शिवसेना स्टाईलने धडा शिकविण्याचा इशारा देण्यात आला. 

कल्याण तालुक्यातील खडवली ग्रामपंचायत हद्दीतील बुथमधील मतदार यादीत घोळ करून बोगस मतदारांची नावे टाकण्यात आली असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १५ ऑक्टोबरला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या तक्रारीनुसार मुरबाड मतदारसंघातील बूथ क्र. ८ मध्ये तब्बल ४०० मतदारांचे पत्ते व नावे दुबार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून, निवडणूक अधिकाऱ्यांनी मागील विधानसभा निवडणुकीतील आणि १ जुलै २०२५ पर्यंत नोंदविलेल्या मतदारांनाच यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेली यादी राजकीय पक्षांना न देता, केवळ ६ दिवसांची मुदत हरकतींसाठी देण्यात आल्याने  या बद्दल शिवसेनेने संशय व्यक्त केला आहे.

गुन्हे दाखल करण्याची मागणी 
ठाकरे गटाकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार बूथ क्र. ८ मध्ये मतदार संख्या १११९ वरून १३८४ झाली, यात सुमारे २६५ मतदारांची वाढ झाली. तर बूथ क्र. ९ मध्ये ७९८ वरून ११९५ (३९७ मतदारांची वाढ) आणि बूथ क्र. १० मध्ये ७७५ वरून ८५५ (८० नव्या नोंदी) आहेत. अर्थात एका वर्षात एवढ्या प्रमाणात मतदारांची वाढ संशयास्पद असून, ही वाढ राजकीय हेतूने बोगस नावे जोडून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे बोगस नोंदी करणाऱ्या आणि मतदार यादीत फेरफार करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी ठाकरे गटाने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT