Railway Black Ticket Saam tv
महाराष्ट्र

Railway Black Ticket: दुधाच्या व्यवसायाआड रेल्वे तिकीटाचा काळाबाजार; तब्‍बल इतक्‍या लाखाची तिकिट जप्‍त

दुधाच्या व्यवसायाआड रेल्वे तिकीटाचा काळाबाजार; तब्‍बल इतक्‍या लाखाची तिकिट जप्‍त

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : दूध व्यवसायाच्या आड रेल्वे तिकीटाचा काळाबाजार सुरू होता. काळाबाजार करणाऱ्या एका दलालावर (RPF) आरपीएफ क्राईम ब्रांचने कारवाई करत अटक केली आहे. सुनील दुबे असं या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून (Kalyan) एक लाख ६८ हजार रुपयांचे तिकीट जप्त करण्यात आले. (Live Marathi News)

डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरात एका दूध डेअरीच्या आड चालणाऱ्या रेल्वे तिकिटाच्या काळा बाजाराचा आरपीएफच्या गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे पोलिस आयुक्त ऋषी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बलाच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरात असलेल्या दूध डेअरीत ५०० ते १ हजार रुपये प्रति सीट कमिशनवर (Railway) रेल्वे तिकिटे विकली जात असल्याचे माहिती आरपीएफच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती.

माहितीच्या आधारे या डेअरी वर छापा टाकत डेअरी चालवणाऱ्या सुनील दुबे याला अटक केली आहे. त्याच्याकडून आरपीएफने १ लाख ६८ हजार रुपये किंमतीची ९४ रेल्वे तिकिटे जप्त केली आहेत. या तिकिटावर प्रवास करणे बाकी होते. सुनील दुबे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या व्यवसायात साथ देणाऱ्यांचा आरपीएफ शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: जास्तीचा खर्च होईल, गणपती बाप्पा पावणार; ५ राशींची होणार भरभराट

राहुल-विजयचा इन्स्टावरील व्हिडीओ ब्लॉक, लोकप्रियता लॉक करण्याचा कट?

परप्रांतीय रिक्षाचालकांसाठी मराठीची कार्यशाळा, मराठी शिकवणाऱ्यावरून भाजप-शिंदेसेनेत स्पर्धा

Tuesday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; 'या' राशींच्या लोकांचे प्रेमसंबंध सुधारणार, जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘भरत’ सिंहाची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT