Kalyan News Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: खेळता– खेळता ट्रान्‍सफॉर्मरमधील वायरचा धक्‍का; विजेचा झटक्याने मुलगा गंभीर जखमी

खेळता– खेळता ट्रान्‍सफॉर्मरमधील वायरचा धक्‍का; विजेचा झटक्याने मुलगा गंभीर जखमी

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : कल्याण पूर्व चक्की नाका परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या टेरेसला लागून असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या वीजेच्या वायरचा झटका (Kalyan News) लागल्याने १२ वर्षाचा मुलगा गंभीररित्या भाजला आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सोनू राम असे मुलाचे नाव असून त्याला खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Live Marathi News)

कल्याण पूर्वेत चक्कीनाका येथे सार्वजनिक शौचालय आहे. या शौचालयाची देखभाल पे अँड यूज या तत्वावर मेघनाथ राम करतात. ते त्यांच्या कुटुंबासह शौचालयाच्या टेरेसवरच वास्‍तव्‍यास राहतात. शौचालयाच्या भिंतीला लागूनच विजेचा ट्रान्सफार्मर आहे. या ट्रान्सफार्मची वायर शौचालयाच्या टेरीसला लागून आहे. आज दुपारच्या सुमारास मेघनाथ यांचा मुलगा सोनू हा टेरेसवर खेळत होता. त्याला विजेच्या वायरचा जोराचा झटका (Electric Shock) लागल्याने तो गंभीररित्या भाजला आहे. त्याला उपाचारासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात नेण्यात होते.

मुलाची प्रकृती गंभीर

मात्र मुलाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला (Dombivali) डोंबिवलीतील एम्स या खाजगी रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान वीजेचा ट्रान्सफार्मरला लागूनच पालिकेने शौचालय उभारले आहे. सोनू याच्या अपघातानंतर भविष्यातही अशा प्रकारची दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी शौचालय बांधलेच कसे असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजन कसं करायचं? जाणून घ्या A टू Z साहित्यादी संपूर्ण यादी

Railway jobs : ग्रॅज्युएशन झालंय? रेल्वेत करा नोकरी, ५८०० जागांसाठी निघाली मेगा भरती, वाचा A टू Z माहिती

Skin Care: ड्राय स्किनला करा Bye Bye! या ‘मॅजिक ऑईल्स’नी चेहरा होईल सॉफ्ट आणि ग्लोइंग

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Krantijyoti Vidyalay: नवीन वर्षात भरणार मराठी शाळा; 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' नूतनवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT