JDCC Bank: ‘राष्ट्रवादी’त पवारांची बंडखोरी; जिल्हा बँकेत ‘राष्ट्रवादी’ला धक्का, संजय पवार अध्यक्षपदी

‘राष्ट्रवादी’त पवारांची बंडखोरी; जिल्हा बँकेत ‘राष्ट्रवादी’ला धक्का, संजय पवार अध्यक्षपदी
JDCC Bank
JDCC BankSaam tv
Published On

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे. पक्षाचे संजय पवार यांनी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केली. (NCP) ‘राष्ट्रवादी’चे ॲड. रवींद्र पाटील यांचा पराभव करून अध्यक्षपदी विजय मिळविला आहे. शिवसेना शिंदे गट, (BJP) भाजप व शिवसेना ठाकरे गटाच्या एका संचालकानेही त्यांना मदत केली आहे. उपाध्यक्षपदी (Jalgaon News) शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. (Breaking Marathi News)

JDCC Bank
Ahmednagar News: गोदावरी नदीत पोहायला गेलेले चारजण बुडाले; तिघांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू

जळगाव जिल्हा बँक (JDCC Bank) अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी शनिवारी (ता. ११) सकाळी ११ ला जिल्हा बँकेच्या सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. पीठासीन अध्यक्षपदी जिल्हा उपनिबंधक ‘सहकार’ संतोष बिडवई होते. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्याला सूचक गुलाबराव देवकर, तर अनुमोदक नाना राजमल पाटील होते. राष्ट्रवादीचेच संजय पवार यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक शिवसेना ठाकरे गटाचे श्‍यामकांत सोनवणे, तर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील होते. उपाध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांनी अर्ज दाखल केला. उपाध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आल्याने अमोल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी मतदान घेण्याचा निर्णय पीठासीन अध्यक्षांनी घेतला.

‘राष्ट्रवादी’त पवारांची बंडखोरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली होती. त्यात अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या चार जणांपैकी ॲड. रवींद्र पाटील यांचे नाव एकमताने निश्‍चित करण्यात आले. मात्र संजय पवार यांनी आपल्याला संधी मिळावी, अशी मागणी कायम ठेवत बंडखोरी करून आपली उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे याच ठिकाणी पक्षाला धक्का बसला.

JDCC Bank
Nandurbar News: नंदूरबार जिल्ह्यातील १५७५ हेक्टरवर पंचनामे पूर्ण

शिवसेना शिंदे गट भाजपची साथ

संजय पवार यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाच्या पाचही संचालकांनी तर भाजपच्या एका व शिवसेना ठाकरे गटाच्या एका संचालकांनी साथ दिली. त्यामुळे पवार यांच्या मताची संख्या आठ झाली होती. विजयासाठी त्यांना तीन मतांची आवश्‍यकता होती. कारण महाविकास आघाडीकडे तब्बल १३ मते होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसची नऊ, शिवसेना ठाकरे गटाचे एक, काँग्रेसची तीन अशी मते होती.

तीन मते फोडून पवारांची बाजी

पीठासीन अध्यक्ष संतोष बिडवई यानी गुप्त मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला. यात महाविकास आघाडीची तेरा मते असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲड. रवींद्र पाटील यांचा विजय निश्‍चीत मानला जात होता. मात्र गुप्त मतदान पद्धतीने तीन मते फुटली आणि एक मताने संजय पवार यांनी बाजी मारली. त्यांना अकरा मते पडली, तर ॲड. रवींद्र पाटील यांना दहा मते पडली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com