Ahmednagar News: गोदावरी नदीत पोहायला गेलेले चारजण बुडाले; तिघांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू

गोदावरी नदीत पोहायला गेलेले चारजण बुडाले; तिघांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू
Godavari River
Godavari RiverSaam tv

सचिन बनसोडे

नेवासा (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरासंगम येथे गोदावरी नदीपात्रात (Godavari River) चारजण बुडाल्याची दुर्देवी घटना शनिवारी घडली. आतापर्यंत (Nevasa) तीन जणांचे मृतदेह सापडले असून अजूनही अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांच्या मदतीने एकाचा शोध सुरू आहे. (Tajya Batmya)

Godavari River
Aurangabad News: कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने मारली विहिरीत उडी; एका आठवड्यात तिसरी आत्महत्या

नेवासा तालुक्यातील सिद्धेश्वर मंदिराजवळ अंघोळीसाठी पाचजण नदीत उतरले होते. यातील चारजण बुडाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील पाचजण मोटरसायकलवर मढी येथे यात्रेसाठी जात होते. जाताना हे सर्वजण प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ अंघोळीसाठी थांबले होते. गोदावरी नदितील खड्यांचा अंदाज न आल्याने पाचपैकी चारजण पाण्यात बुडाले असून एकाचे प्राण वाचले आहेत.

तीन जणांचे मृतदेह काढले

दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान ही घटना घडली. यात घटनेतील बाबासाहेब अशोक गोरे (वय ३५), नागेश दिलीप गोरे (वय २०), आकाश भागिनाथ गोरे (वय २०) आणि शंकर पारसनाथ घोडके (वय २२) या चौघांचा समावेश आहे. यातील तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले असून अजूनही एकाचा शोध सुरू आहे. अहमदनगर, संभाजीनगर, शेवगाव येथील अग्निशमन दलाचे २० जवान आणि स्थानिकांच्या मदतीने सकाळपासून एकाचा शोध सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com