Ladki Bahin Yojana: eKYC केली पण खात्यात डिसेंबरचे ₹१५०० आलेच नाही; लाडक्या बहिणींचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Ladki Bahin Yojana Yavatmal Women Strike: लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी केवायसी करुनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यामुळे महिलांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहलं आहे.
ladki Bahin yojana
ladki Bahin yojana update Saam tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता आलाच नाही

केवायसी करुनही पैसे आले नाहीत

यवतमाळमधील महिलांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत हप्ता न मिळालेल्या महिला यवतमाळ येथील महिला व बालकल्याण विभागात धडक देत आक्रमक झाल्या आहे. उपस्थित अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवर संताप व्यक्त करित आमच्या केवायसी प्रक्रिया पूर्ण करून लाभ मिळवून द्या अन्यथा सर्वांचा लाभ बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान महिला व बालकल्याण विभागाने ई-केवायसीची लिंक पुन्हा सुरू करावी, असे पत्र थेट शासनाकडे पाठविले आहे. आता शासन या पत्राचा विचार करणार की नाही ही येणारी वेळच सांगणार आहे.

ladki Bahin yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! झेडपी निवडणुकीआधी जानेवारीचे ₹१५०० येण्याची शक्यता; वाचा सविस्तर

महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 18 ते 65 वर्षवयोगटातील महिलांना दीड हजार रुपये महिना देण्यात येत आहे. या योजनेत जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक महिला पात्र ठरल्या होत्या. मात्र, मध्यंतरी शासनाने केलेल्या सर्वेत सरकारी नोकरदार, चारचाकी, टॅक्सचा भरणा करणार्‍या तसेच एकाच कुटुंबातील तीनपेक्षा अधिक महिलांची नावे वगळण्यात आली होती. त्यानंतर आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी अनिवार्य केली होती. ई-केवायसीची 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत 60 टक्क्याहून अधिक पात्र महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली. तर काही महिलांनी केवायसीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. दोन दिवसांपूर्वीच शासनाने डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला. परंतु शेकडो महिलांना लाभ खात्यात जमा झालाच नाही. यामध्ये केवायसी पूर्ण करणार्‍या बहुतांश महिलांचा समावेश आहे.

या प्रकारामुळे संतप्त महिला दैनंदिन महिला व बालकल्याण विभागात धडक देत आहे. लाभ बंद करण्यात आल्याची कारणमीमांसा उपस्थित अधिकारी, कर्मचार्‍यांना केल्या जात आहे. केवायसी पूर्ण झाल्याचे ऑनलाइन दिसत आहे. तरीसुद्धा लाभ न दिल्याचे प्रकार समोर आले आहे. या प्रकारामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या डोकेदुखीत प्रचंड वाढ झाली आहे. शेवटी महिला व बालकल्याण विभागाने केवायसीची लिंक पुन्हा चालू करावी, असे पत्र पाठविले आहे. या पत्रावर शासन कधी आणि नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ladki Bahin yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! झेडपी निवडणुकीआधी जानेवारीचे ₹१५०० येण्याची शक्यता; वाचा सविस्तर

शासनाने लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदत दिली होती. निर्धारित मुदतीत बहुतांश पात्र महिलांनी केवायसी करून घेण्याचा निर्णय घेतला. हजारो महिलांनी केवायसी केली. त्यामुळे दीड हजार रुपयांचा हप्ता नियमित मिळेल, अशी आशा महिलांना होती. परंतु बहुतांश महिलांची केवायसी चुकली आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांच्या घरात कुणीही नोकरीवर नाही, अशांच्या केवायसीत नोकरी असल्याचा उल्लेख आला आहे. त्यामुळे महिलांमध्ये सर्वाधिक नाराजी पसरली आहे. चुकलेली केवायसी दुरुस्तीची व्यवस्था केल्या जाईल का असाही प्रश्‍न महिलांमध्ये उपस्थित होत आहे.

ladki Bahin yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनी eKYC केली तरी डिसेंबरचे ₹१५०० आले नाही; कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com