KDMC News Saam tv
महाराष्ट्र

KDMC News : आठवडाभरापूर्वी पाईपलाईन फुटली; रहिवाशांना विकत आणावे लागतेय पाणी, तक्रार करूनही केडीएमसीचे दुर्लक्ष

Kalyan News : गेल्या आठ दिवसांपूर्वी या इमारतीला पाणीपुरवठा करणारी पाण्याची पाईप लाईन फुटली आहे. दुरुस्ती करण्यात आली नसल्याने इमारतीतील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा दूषित स्वरूपात होत आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: केडीएमसी मुख्यालयाजवळ असलेल्या सनराईज या इमारतीला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन आठ दिवसांपूर्वी फुटली आहे. या फुटलेल्या पाईपमधून दूषित पाणी येत असल्याने याबाबत नागरिकानी केडीएमसीला तक्रार करूनही केडीएमसीने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे या परिसरातील कुटुंबांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

कल्याण- डोंबिवली महापालिका मुख्यालयाजवळ सनराईज गॅलेक्सी इमारत आहे. या इमारतीमध्ये ६० ते ७० कुटुंबे वास्तव्यास आहेत. दरम्यान गेल्या आठ दिवसांपूर्वी या इमारतीला पाणीपुरवठा करणारी पाण्याची पाईप लाईन फुटली आहे. याची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने इमारतीतील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा दूषित स्वरूपात होत आहे. या पाण्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

रहिवाशांकडून केडीएमसीकडे तक्रार 

गेल्या आठ दिवसांपासून या इमारतीतील रहिवाशांनी अनेक तक्रारी महानगरपालिकेकडे केल्या आहेत. मात्र याबाबत संबंधित अधिकारी व पालिका कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही केडीएमसी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. केडीएमसीने तत्काळ पाईप लाईन दुरुस्ती केली नाही; तर उग्र आंदोलन करू असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. 

पाण्याचा टँकर मागवावा लागतोय 

इमारतीतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासह धुणे भांडी करण्यासाठी टँकरचे पाणी विकत घ्यावं लागत आहे. पिण्यासाठी पाणी देखील दररोज ३०० ते ४०० रुपये खर्च करुन विकत घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड पडत आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त करत पालिका कर घेते, पाण्याचे बिल प्रत्येक महिन्यात घेते. मग योग्य सेवा का दिली जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. पालिकेने त्वरित समस्या सोडवली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT