अभिजित देशमुख
कल्याण : कल्याण पुर्वेतील वालधुनी, आनंदवाडी तसेच अशोकनगर परिसरात असलेल्या घरांना रेल्वे प्रशासनाकडून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे (Kalyan) नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी या ठिकाणच्या नागरीकांचे पुनर्वसनाचे धोरण ठरवुन त्यांचे पुनर्वसन होईपर्यत; त्यांच्या घरावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश संबंधीतांना प्राधान्याने देण्यात यावेत. तसेच सदर पुनर्वसनाबाबत संबंधित अधिकारी यांची दालनात बैठक आयोजित करण्यात यावी; अशी मागणी रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (Tajya Batmya)
कल्याण पुर्वेतील वालधुनी, आनंदवाडी तसेच अशोकनगर व लगतच्या परिसरातील रेल्वेच्या (Railway) जागेवर हजारो नागरीक गेल्या ३५ ते ४० वर्षापासुन घरे बांधुन राहत आहेत. या परिसरातील नागरिकांना रेल्वे मार्फत घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत कल्याण पूर्वचे (BJP) भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी या नागरिकांचे भेट घेतली समस्या जाणून घेतली. या संदर्भात आमदार गायकवाड यांनी रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र पाठवले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पत्राद्वारे आमदार गायकवाड यांनी वालधुनी, आनंदवाडी तसेच अशोकनगर परिसरात किमान ३५ ते ४० वर्षापासून नागरिक राहत आहेत. केडीएमसीकडे नियमितपणे मालमत्ता कर व पाणी बिल तसेच विद्युत बिल भरत आहेत. रेल्वेकडून या नागरिकांना नोटीस पाठवण्यात आले असले तरी जोरजबरदस्तीने पोलीस बाळाचा वापर करून कारवाई केल्यास या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. संबंधित नागरिकांनी रेल्वेने दिलेल्या नोटीस नुसार संबंधित कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्याकडे जमा केली असली तरी कागदपत्रे जमा केले नसल्याचा नोटिसा त्यांना पाठवण्यात आल्या असल्याचे म्हटले आहे. तसेच सर्व नागरीकांचे पुनर्वसन करण्याबाबतचे धोरण ठरवुन पुनर्वसन होईपर्यत त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश संबंधीतांना प्राधान्याने देण्यात यावेत. तसेच सदर पुनर्वसनाबाबत संबंधित अधिकारी यांची आपल्या दालनात बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.