Kalyan News: रुक्मिणीबाई रुग्णालयातील सोयी सुविधांबाबत दुर्लक्ष कराल तर आंदोलन करू, शिवसेनेचा केडीएमसीला इशारा

Kalyan Rukmini Hospital: ''केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात तज्ञ डॉक्टर नाहीत. रुग्ण तपासणीची काही यंत्रणा नाही. मुख्यमंत्र्यांनी या रुग्णलयास उपजिल्हा रुग्णालय घोषित करावे'', अशी मागणी जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी केली आहे.
Kalyan Rukmini Hospital
Kalyan Rukmini HospitalSaam Tv
Published On

>> अभिजित देशमुख

Kalyan Rukmini Hospital:

''केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात तज्ञ डॉक्टर नाहीत. रुग्ण तपासणीची काही यंत्रणा नाही. मुख्यमंत्र्यांनी या रुग्णलयास उपजिल्हा रुग्णालय घोषित करावे'', अशी मागणी जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी केली आहे. त्यांनी महापालिकेने रुग्णालयात सुरु असलेली आरोग्य सेवेतील अनास्था दूर करावी. अन्यथा जन आंदोलन छेडणार, असा इशारा पालिकेला दिलाय.

आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त कल्याण शिवसेना शहर शाखेतून रुग्णालय फळ वाटप करण्यात आले. यादरम्यान रुग्णालयातील गैरसोयीबाबत जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी संताप व्यक्त केला. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने आंदोलनाचा इशारा दिल्याने सत्ताधाऱ्यांनाघरचा आहेर दिल्याचं बोललं जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Rukmini Hospital
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी घेतलेली जाहीर शपथ पूर्ण केली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मिळालेल्या माहितीनुसार, आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती दिनानिमित्त शिवसेना शहर शाखेच्या वतीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णाना फळांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहर पप्रमुख रवी पाटील उपस्थित होते. (Latest Marathi News)

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे म्हणाले की, आम्ही ज्या रुग्णांना फळे देण्यासाठी आलो होतो, रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. त्यांना उपचारासाठी कळवा आणि मुंबईला पाठविले जाते. या रुग्णलायात तज्ञ डॉक्टर नाही. एमआरआयची सुविधा नाही. प्रसूतिगृह येथील वसंत व्हॅली येथे सुरु केले आहे. ते यापूर्वी रुक्मिणीबाई रुग्णालयात होते. आजपासच्या शहरातील महिला प्रसूतीसाठी येत होत्या. त्याना ते स्टेशनपासून जवळ असल्याने सोयीचे होते. मात्र आत्ता लांब जावे लागत आहे.

Kalyan Rukmini Hospital
Devendra Fadnavis: मराठा समाजाचा प्रश्न सुटणार; मराठा आणि ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांची महत्वाची प्रतिक्रिया

काही दिवसापूर्वी एका महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच झाली होती. रुग्णालयास उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा. जेणेकरून सुविधा उपलब्ध होतील, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महापालिकेने रुकिमीनीबाई रुग्णलयातील सुविधांकडे दुर्लक्ष करून नये अन्यथा आम्ही आंदोलन उभारू, असा इशारा मोरे यांनी प्रशासनाला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com