Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: हॉटेल चालकासमोर महापालिका झाली हतबल

हॉटेल चालकासमोर महापालिका झाली हतबल

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : कल्याण स्टेशन परिसरातील दीपक हॉटेलच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी आज महापालिकेचा पथक गेले. मात्र हॉटेल मालकाने विरोध केल्याने तीन तास ताटकळत (Kalyan News) उभे राहून अखेर महापालिकेचे पथक माघारी फिरावे लागले. याप्रकरणी संबंधित हॉटेल चालकावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचं (Corporation) महापालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आले. (Live Marathi News)

कल्‍याणमधील हॉटेल मालकाने ही कारवाई बेकायदेशीर असून याआधी देखील मी पालिकेच्या पॅनलवरील स्ट्रक्चरल ऑडिटरमार्फत स्ट्रक्चरल ऑडिटर केलं होतं. मात्र महापालिकेने त्यात त्रुटी काढल्यात विजेटीआय मार्फत ऑडिट करण्यासाठी आज ते आले. मात्र हे सर्व बेकायदेशीर आहे. माझं हॉटेल बंद आहे. हॉटेलमध्ये टाळा तोडून घुसने बेकायदेशीर असल्याचे सांगितले. दरम्यान सर्वसामान्य नागरीकांच्या घरावर कारवाईत तत्परता दाखविणारी महापालिका एका हॉटेल व्यवसायिकासमोर हतबल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या हॉटेलचे स्ट्रक्चरल ऑडीट होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कल्याण स्टेशन परिसरात दीपक हॉटेल रस्त्याला लागूनच आहे. या हॉटेलचे स्ट्रक्टरल ऑडीट करण्यासाठी महापालिकेने ऑडीट करण्याची नोटिस हॉटेल मालकास पाठविली. हॉटेल मालकाने महापालिकेचे पथक ऑडीटकरीता येणार त्या आधीच कालपासून हॉटेल बंद केले आहे. आज महापालिकेतर्फे ऑडीट करण्यासाठी प्रभाग अधिकारी तुषार सोनावणे हे त्यांच्या पथकासह पोलिस बंदोबस्तात पोहचले. त्याठिकाणी हॉटेल मालकाने ऑडीट करण्यास मज्जाव केला. हॉटेल मालकाने महापालिकेचे ऑडीट कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी हॉटेल मालकाने महापालिकेच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्यामुळे सबंधित मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT