Railway Crime Saam tv
महाराष्ट्र

Railway Crime: झटपट पैसे कमवण्यासाठी करायचा चोरी; धावत्या लोकलमध्ये प्रवाशांच्या हातावर फटका मारत मोबाईल चोरी, चोरटा गजाआड

झटपट पैसे कमवण्यासाठी करायचा चोरी; धावत्या लोकलमध्ये प्रवाशांच्या हातावर फटका मारत मोबाईल चोरी, चोरटा गजाआड

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख

कल्याण : धावत्या लोकलमध्ये दरवाजावर उभे असलेल्या प्रवाशाच्या हातावर फटका मारत त्याच्या हातातून मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसानी (Railway Police) अटक केली आहे. संदीप प्रसाद असं या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून अशा प्रकारचे चार गुन्हे उघडकीस (Kalyan News)आणले आहेत. झट पट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी त्याने चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे. (Latest Marathi News)

रेल्वे (Railway) स्टेशनलगत लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर काठीने फटका मारत मोबाईल चोरी होण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या होत्या. आंबिवलीहून मुंबईच्या दिशेने लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या हाताला फटका मारत त्याचा मोबाईल हिसकावल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती.

चार गुन्‍हे उघकीस

तक्रारीनुसार कल्याण रेल्वे पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास व खबर्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे कल्याण लोहमार्ग पोलिसानी संदीप प्रसाद या चोरट्याला बेड्या ठोकल्या. संदीप प्रसाद याच्याकडून अशा प्रकारचे चार गुन्हे उघकीस आणले असून चार मोबाईल जप्त करण्यात आले असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता WhatsApp Call सुद्धा रेकॉर्ड होतील, फॉलो करा या 4 स्टेप्स

Maharashtra Live News Update: यवतमाळात भाजपची विजयी मिरवणूक,भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन

वारं फिरलं, भाजप आणि शिंदेसेनेला काँग्रेसचा पॉवरफूल दणका, 35 वर्ष काम केलेल्या शेकडो निष्ठावंताचा राजीनामा

फिरकी गोलंदाजी, शेवटच्या षटकांत तुफानी फटकेबाजी; ५ आयपीएल संघांकडून खेळलेल्या भारतीय क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती

Local Body Election: पालिका निवडणुकीत भाजप नंबर १ चा पक्ष कसा ठरला, कुणाला क्रेडिट आणि कसा होता प्लान?

SCROLL FOR NEXT