Raju Patil Saam tv
महाराष्ट्र

Raju Patil News : लाखोंच्या मताधिक्याने कुणी निवडून येणार नाही; मनसे आमदार राजू पाटील यांचा श्रीकांत शिंदे यांना सल्ला

Kalyan News : मनसे आमदार राजू पाटील यांनी निवडून यायचं असेल तर त्यांनी सावरून घ्या असा सल्ला नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांना दिला

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण लोकसभा ही काठावर पास होण्यासारखी स्थिती आहे. इथे अँटीइन्कबन्सी आहे. लाखो मतधिकाक्याने (Kalyan) काेणी निवडणूक जिंकणार असे चित्र नाही. महायुतीत धुसफूस सुरु आहे. त्यात ही राष्ट्रवादी (NCP) आली आहे. ज्यांना निवडून यायचे आहे. त्यांनी सावरुन घ्यावे; असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना नाव न घेता दिला आहे. (Maharashtra News)

शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी बारामती निवडणूक लढवण्याचे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांनी या नेत्यांना समजवा, अन्यथा कल्याणचा निकाल वेगळा लागू शकतो; असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिला होता. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी निवडून यायचं असेल तर त्यांनी सावरून घ्या असा सल्ला नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन दिवसात ४० विकास कामांचे भूमीपूजन
गेल्या दोन दिवसापासून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात भूमीपूजनाचे कार्यक्रम सुरु आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्हा परिषद, नवी मुंबई महापालिका, ठाणे महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिका अशा चार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध लेखाशीर्षाखाली विकास कामे मंजूर करण्यात आली आहे. जवळपास २६ कोटी ५० लाख रुपये खर्चाची कामे मंजूर झाली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या कामांचे भूमीपूजन सुरु केले आहे. आत्तापर्यंत ४० पेक्षा जास्त विकास कामांचे भूमीपूजन झाले असल्याची माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिशा सालियन प्रकरणात ठाकरेंनी सत्तेचा गैरवापर केला? तपास यंत्रणेवर काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष?

BSNL Recharge Plan: फक्त १ रुपयात २४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन; २४GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या फायदे

Banana Vs Pomegranate Fruit Benefits: केळी खावी की डाळिंब? डॉक्टरांच्या मते 'हे' फळ देतं शरीराला दुप्पट ताकद; पाहा आश्चर्यकारक फायदे

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

Gondhal Movie: ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपटाची एंट्री! 'गोंधळ'ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड

SCROLL FOR NEXT