Raju Patil Eknath Shinde Saam tv
महाराष्ट्र

Raju Patil News : गंगेतील डुबकीपेक्षा त्या इमारतीतील रहिवाशांना भेटा जास्त पुण्य मिळेल; मनसे नेते राजू पाटील यांचा एकनाथ शिंदेंना टोला

Kalyan News : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत ६५ अनधिकृत इमारतींच्या मुद्द्यावरून माजी आमदार राजू पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाना साधला

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना, कागदपत्रे बनवून लोकांची फसवणूक करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांना ठाण्यातून अभय आहे. गँग्स ऑफ डोंबिवलीचा आका, म्होरक्या ठाण्यात आहे. विद्यमान पालकमंत्री आहात. तर मुलगा या मतदारसंघात खासदार आहे. तुम्हाला सेलिब्रिटींच्या घरी जाण्यास वेळ आहे. गंगेत डुबकी मारून पुण्य मिळवण्यापेक्षा या ६५ इमारतीतील रहिवाशांना एकदा भेटा जास्त पुण्य मिळेल; असा टोला मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला आहे.

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत ६५ अनधिकृत इमारतींच्या मुद्द्यावरून मनसेचे नेते व माजी आमदार राजू पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाना साधला आहे. तसेच यात ही खूप मोठी चैन आहे. काही लोक केवळ आमदार दिसतात. पण त्यांची भूमिका हस्तकांसारखी आहे; असे सांगत शिंदे गटाचे स्थानिक आमदार राजेश मोरे यांना लक्ष केलं.

मदतीसाठी मनसे तयार 
अनधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी मनसे उभी असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले कि या रहिवाशांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी आम्ही आर्थिक मदत करू. मात्र शासनाने त्यांना दिलासा द्यावा. आम्ही लवकरच मंत्री गणेश नाईक यांची भेट घेणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही न्यायाची अपेक्षा आहे. तर दिव्यातील बेकायदा इमारतीत ठाणे महापालिकेचा जोशी नावाचा अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाचे पाच नगरसेवक पार्टनर आहेत. बेकायदा इमारतीच्या एका स्लॅब मागे तीन लाख रुपये घेतले जात असल्याचा गंभीर आरोप मनसे नेते राजू पाटील यांनी केला

बिल्डरला धमकी देत निवडणुकीत करून घेतले काम 
माजी आमदार पाटील यांनी सांगितले कि विधानसभेच्या निवडणुकीवेळी संबंधित बिल्डरला इमारत तोडण्याची धमकी दिली जात होती, पक्षात घेतलं जातं होतं आणि त्याच्याकडून निवडणुकीत मतदान करण्याचे काम करून घेतले जात होते; असा गंभीर आरोप देखील पाटील यांनी केला. तर ही चैन जोपर्यंत तोडली जात नाही; तोपर्यंत येथे काहीही होणार नाही," असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT