Kalyan News
Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक; आमदारांकडून स्टेशन परिसरात पाहणी दौरा

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख

कल्याण : एक नंबर फेरीवाले..दोन नंबर रिक्षावाले..तीन नंबर फुटपाथवर अतिक्रमण करणारे दुकानदार पण आमच्या टार्गेटवर आहेत. लोकांनी निश्चिंत रहावे (Kalyan News) आम्ही आता रस्त्यावर उतरलोय; असा इशारा मनसे (MNS) आमदार राजू पाटील यांनी आज डोंबिवलीत दिला. रस्ते फेरीवाले मुक्त करा यासाठी मनसेने पंधरा दिवसाचा अल्टिमेटम महापालिका प्रशासनाला दिला होता. अल्टिमेटम संपला असून आज मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी पदाधिकाऱ्यांसह रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी केली. (Latest Marathi News)

मनसेने रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. कल्याण– डोंबिवली महापालिका प्रशासनाला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम मनसेने दिला होता. २८ मार्चला डोंबिवली स्टेशन परिसरात मनसेने डेडलाईन संपली आता दुर्लक्ष करा; अशा आशयाचे बॅनर लावले होते. त्यानंतर आज महापालिकेने फेरीवाल्याविरोधात कारवाई करत रस्ते मोकळे केल्याचे पाहायला मिळालं. आज मनसे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवली स्टेशन परिसराची पाहणी केली. यावेळी प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले.

मनसे आमदार राजू पाटील यांनी पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस, महापालिका अधिकारी, फेरीवाल्यांचे पदाधिकारी व रिक्षा युनियनच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. रिक्षा मीटरने सुरू करा, रिक्षा स्टॅन्डची जागा ठरवून द्या, फेरीवाल्यांबाबत योग्य तो निर्णय घ्या, अतिक्रण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करा, रस्ते मोकळे करा अशा काही सूचना आमदार राजू पाटील यांनी दिल्या.

खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा

यावेळी बोलताना त्‍यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूरला एक रस्ता खराब होतो. म्हणून अधिकाऱ्याची तडका फडकी बदली केली. आपल्या मतदारसंघात काय चाललंय हे पण पाहणं गरजेचं आहे. बदलापूर, अंबरनाथ उल्हासनगर, विठ्ठलवाडी, ठाकुर्ली, दिवा, डोंबिवली, कोपर रेल्वे स्थानकाचे परिस्थिती काय आहे हे पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना झापले पाहिजे; हा माझा सल्ला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trans-Harbour Mega Block Update | रेल्वेचा सरप्राईज मेगाब्लॉक, लोकल नसल्याने प्रवाशांचे हाल

Today's Marathi News Live : धुळ्यात काँग्रेसला मोठं खिंडार, तुषार शेवाळेंनी भाजपमध्ये केला प्रवेश

Pune Loksabha Election: पुणे पोलिसांचा गावगुंडांना दणका; मतदानापूर्वी ९ हजार २५५ गुंडांची झाडाझडती

Borivali News : मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार जणांना अटक

Devendra Fandanvis: 'बारामतीत अजित दादा एकटे अभिमन्यूसारखे लढले; भाजपला त्याचं अप्रुप', देवेंद्र फडणवीसांची स्तुतीसुमनं

SCROLL FOR NEXT