Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार

Kalyan News : मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी अरविंद मोरे यांनी वीस तारखेला जरांगे पाटील यांची सभा होणार आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : येत्या २० नोव्हेम्बरला मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात होणार आहे. (Maratha Aarkshan) मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पहिल्यांदाच जरांगे पाटील यांची सभा होणार असल्याने या सभेत जरांगे पाटील काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कल्याण (Kalyan) मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने या सभेचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. (Live Marathi News)

मराठा आरक्षणाचा लढा देणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील येत्या सोमवारी कल्याणमध्ये येणार आहेत. मराठा समाजाच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार आहे. कल्याणमधील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने या दौऱ्याचे आयोजन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील यांना कल्याणमध्ये आणण्याचे प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा करण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे यांचे कल्याण मध्ये जाहीर सभा होणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्व पक्षातील नेते येणार एकत्र 

जरांगे पाटील यांच्या सभेच्या निमित्ताने कल्याणमधील शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, आम आदमी पार्टीमधील मराठा नेते एकत्र आल्याचे दिसून येते. याबाबत बोलताना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी अरविंद मोरे यांनी वीस तारखेला जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. कोळशेवाडीमधील पोटे मैदान हे सभेसाठी जवळपास निश्चित करण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या सभेसाठी येणार असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT