Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: महिलेकडून सव्वाचार लाखांचे मंगळसूत्र हस्तगत; कल्याण रेल्वे गुन्हे शाखेची कारवाई

महिलेकडून सव्वाचार लाखांचे मंगळसूत्र हस्तगत; कल्याण रेल्वे गुन्हे शाखेची कारवाई

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसलेल्या महिला प्रवाशाची नजर चुकवून सोन्याचे मंगळसूत्र असलेली पर्स चोरणाऱ्या चोरट्या महिलेला (Kalyan) कल्याण गुन्हे रेल्वे शाखेने अटक केली आहे. कविता डूमरे असे या चोरट्या महिलेचे नाव आहे. सीसीटिव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे टिटवाळा येथून तिला अटक करत तिच्याकडून चोरलेले सात तोळ्याचे सव्वा चार लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र हस्तगत केले आहे. (Breaking Marathi News)

ठाकुर्ली रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर बसलेल्या एका महिलेची नजर चुकवून सोन्याचे मंगळसूत्र असलेली पर्स चोरून एक महिला पसार झाली होती. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. डोंबिवली (Dombivali) रेल्वे पोलिसांसह कल्याण रेल्वे गुन्हे शाखा देखील या गुन्ह्याचा समांतर तपास करत होती. ठाकुर्ली स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासत या महिलेची ओळख पटवण्यात आली. तांत्रिक माहितीच्या आधारे ही महिला टिटवाळा येथील रहिवासी असल्याचे माहिती समोर आली.

कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने टिटवाळा येथे जाऊन या महिलेला बेड्या ठोकल्या. तिच्याकडून सव्वाचार लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले. तिने या आधी देखील अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का? याचा तपास कल्याण रेल्वे गुन्हे शाखा करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : यशवंत सेनेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा..

Gold Price Today: आनंदाची बातमी! सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; पाहा आजचे दर

HAL Recruitment: हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ६०,००० रुपये पगार; अशा पद्धतीने करा अर्ज

Vaibhav-Irina : देखो ना खुद को जरा... इरिना-वैभवचा जिममध्ये रोमँटिक डान्स; चाहते म्हणाले, 'फॉरेनची पाटलीण'

New Family Pension Rule: आई- बाबांची पेन्शन मुलांना मिळते का? लग्न झालेल्या मुलीचा अधिकार किती?

SCROLL FOR NEXT