KDMC Hospital Saam tv
महाराष्ट्र

KDMC Hospital : केडीएमसी रुग्णालयात महिलेचे मृत्यू प्रकरण; डॉक्टरसह नर्स, रुग्णवाहिका चालकावर कारवाई

Kalyan News : केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी सदर प्रकरणाची दखल घेत चौकशीअंती महिलेच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार धरत डॉक्टरसह नर्स आणि रुग्णवाहिका चालकावर कारवाई केली आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: केडीएमसी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेला रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी सदर प्रकरणाची दखल घेत चौकशीअंती महिलेच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार धरत डॉक्टरसह नर्स आणि रुग्णवाहिका चालकावर कारवाई केली आहे.

कल्याणमधील केडीएमसीच्या रुपेरी बाई रुग्णालयात काही दिवसांपूर्वी रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेच्या मृत्यू प्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालामध्ये रुक्मिणीबाई रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक हरिश्चंद्र यशवंतराव, प्रमोद लासूरे यांनी कर्तव्यावर असताना रुग्णवाहिकेतून रुग्णाला स्थलांतरित करण्यामध्ये दिरंगाई केली. तसेच मारुती निकम यांनी रुग्णवाहिका अनावश्यक रित्या डिझेल भरण्यासाठी घेऊन गेल्यामुळे कर्तव्य कसूर केल्याचे दिसून आले.

तसेच अपघात कक्षातील नर्स नमिता भोय, सिस्टर इन्चार्ज जयश्री रायकर यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना सदर रुग्ण स्थलांतरित झाले नसल्याची माहिती दिली नाही. तर डॉ. उमर पटेल यांनी रुग्णाला स्थलांतरित करण्यासाठी संबंधित वाहनचालक यांच्याकडे पाठपुरावा केला नाही व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याला बाबत माहिती दिली नाही. रुग्ण वेळेवर स्थलांतरित झाले असते, तर वेळेवर उपचार चालू झाले असते व रुग्णाचा जीव वाचू शकला असता; असा निष्कर्ष अहवालात नमूद आहे.

सहा जणांवर कारवाई 

दरम्यान या प्रकरणात सर्वाना जबाबदार धरत नर्स जयश्री रायकर, वाहन चालक प्रमोद लासुरे, मारुती निकम, हरिश्चंद्र यशवंतराव यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर बाह्य संस्थेत मार्फत नियुक्त असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमर पाटील, नर्स नमिता भोय यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई केडीएमसीचे आयुक्त गोयल यांनी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Lokhande : नाकात नथ अन् कानात बुगडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज, पाहा PHOTO

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Shweta Tiwari: 'चाळीशीतही क्यूट दिसतेस' श्वेता तिवारीचे नवीन फोटो चर्चेत

Shocking: आई-बापाने काबाड कष्ट करत म्हशी घ्यायला पै पै जमवली, मुलानं 'फ्री फायर' गेमसाठी ५ लाख उडवले

SCROLL FOR NEXT