KDMC News Saam tv
महाराष्ट्र

KDMC News: अधिकाऱ्यांच्या नावाने दगडं टाकत निषेध; कल्याण डोंबिवलीत मनसेचे अनोखे खड्डे भरो आंदोलन  

Kalyan News : अधिकाऱ्यांच्या नावाने दगडं टाकत निषेध; कल्याण डोंबिवलीत मनसेने अनोखे खड्डे भरो आंदोलन  

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख
कल्याण
: कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झालेत .रस्त्यावरील खड्डे व (Kalyan) महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभार सुरु आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्डयामंध्ये पालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने दगड टाकत (MNS) मनसेने खड्डे भरो आंदोलन केले. (Breaking Marathi News)

कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे व महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड, मनसे आमदार राजू पाटील इतकेच नव्हे तर सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला. (Dombivli) थेट प्रशासनावर टीका केली होती. यानंतर  महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवले जातील असा दावा केला होता. मात्र गणरायाच्या आगमन देखील खड्ड्यातूनच झालं. त्यामुळे आता (KDMC) महापालिका प्रशासनाच्या या गलथाण कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येतेय.

मनसे आमदार राजू पाटील यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्याऐवजी रस्त्यांवरील खड्डे भरा जेणेकरून नागरिकांचे आशीर्वाद तुम्हाला आणि मला लाभतील असं आवाहन मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केलं होतं. आमदार पाटील यांच्या आवाहनानंतर आज मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण ग्रामीण भागातील निळजे परिसरात स्वखर्चाने रस्त्यांवर खड्डे बुजवण्यात सुरुवात केली. आंदोलनादरम्यान आयुक्तांच्या नावाने मोठे मोठे दगडं खड्ड्यांमध्ये टाकत महापालिकेचा निषेध नोंदवण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT