Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : मुंबई पोलिसांवर हल्ला करणारा इराणी गजाआड; १० गुन्ह्यात होता फरार

मुंबई पोलिसांवर हल्ला करणारा इराणी गजाआड; १० गुन्ह्यात होता फरार

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : देशभरात चैन स्नेचीग, जबरी चोरी, वाहन चोरी करत धुमाकूळ घालणाऱ्या इराणी चोरट्याला (Kalyan) कल्याण जवळच्या आंबिवली इराणी वस्तीतुन सापळा रचत कल्याण खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अपेदारा आफ्रिदि असे या चोरट्याचे नाव असून आफ्रिदी याने काही दिवसांपूर्वी चोरट्याला अटक करण्यास गेलेल्या (Mumbai Police) मुंबई पोलिसांवर दगडफेक केली होती. अटक करण्यात आलेला आफ्रिदी हा  १० गुन्ह्यांमध्ये फरार होता. (Breaking Marathi News)

ठाणे जिल्हासह राज्य व देशभरात चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या अपेदारा आफ्रिदी याचा शोध पोलीस घेत होते. मात्र अनेक वर्षापासून तो पोलिसांना चकवा देत होता. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांचे पथक कल्याणजवळ आंबिवली येथील इराणी वस्तीत एका चोरट्याला अटक करून नेत असताना अपे आफ्रिदि याने विरोध करत पोलिसांवर दगडफेक केली होती. पोलीस आफ्रिदीचा शोध घेत होते. आफ्रिदी कल्याण जवळील आंबिवली मंगलनगर येथे राहत असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली. 

३० अधिक गुन्हे 

सदर मिळालेल्या माहितीनुसार डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अनिल गायकवाड व त्यांच्या पथकाने मंगल नगर परिसरात (Crime News) सापळा रचला. आफ्रिदी येताना दिसताच त्याच्यावर झडप घालत त्याला ताब्यात घेतले. आफ्रिदी विरोधात देशभरात ३० हून अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT