अभिजित देशमुख
कल्याण : मोबाईल, लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रिपेरिंगच्या नावाखाली दुकान थाटले. या दुकानात परदेशातून अवैधरित्या एक्साईज ड्युटी चुकवून भारतात आणलेल्या महागड्या दारू विक्रीचा व्यवसाय केला जात होता. उल्हासनगरमध्ये हा अवैध धंदा सुरु होता. अशा एका दारू तस्कराला राज्य उत्पादन शुल्क विभाग कल्याणच्या भरारी पथकाने बेडा ठोकल्या आहेत.
कल्याणच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कमलेश दहराम याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान उल्हासनगर परिसरात विविध व्यवसायाच्या पडद्याआडून बेकायदेशीर रित्या परराज्यातून परदेशातून महागड्या स्कॉच विदेशी दारू आणून त्या विक्री होत असल्याच्या अनेक घटना इथून मागे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाने उघडकीस आणल्या आहेत. यानंतर पुन्हा एक प्रकार उजेडात आला आहे.
सापळा रचत केली कारवाई
उल्हासनगर एक परिसरात जय सत्यानंद ट्रेडर्स या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रिपेरिंगच्या दुकानात परदेशी महागड्या दारूच्या बाटल्या विकल्या जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाला मिळाली होती. हा दारू तस्कर परदेशातून एक्साईज ड्युटी चुकवून महागडा दारू या भारतात विकत होता. माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण भरारी पथकाने पथक तयार करत सापळा रचला.
साडेतीन लाखाची दारू जप्त
सदर दुकानाच्या परिसरात सापळा रचला आणि कमलेश दहराम या दारू तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या दुकानातून परदेशातून आणलेल्या स्कॉचच्या सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या ६९ बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच कमलेश कधीपासून हा व्यवसाय करत होता; याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.