Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Railway Police : एमआरपीपेक्षा जास्त दराने खाद्यपदार्थ विक्री; तक्रार करणाऱ्याला मारहाण, गीतांजली एक्स्प्रेसमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी

Kalyan News : गीतांजली एक्सप्रेसमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि खाद्य पदार्थ एमआरपी पेक्षा जास्त किमतीत देत असल्याची तक्रार केल्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्याला आयआरटीसी कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: रेल्वे प्रवासादरम्यान गाडीमध्ये प्रवाशांना खाद्य पदार्थ तसेच पाण्याच्या बाटल्यांची विक्री केली जात असते. रेल्वे प्रशासनाकडूनच हि सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असते. मात्र या खाद्य पदार्थांची विक्री एमआरपी पेक्षा जादा दर घेऊन विक्री केली जात असते. याबाबत तक्रार करणाऱ्या रेल्वे प्रवाशाला आयआरटीसीच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार गीतांजली एक्सप्रेसमध्ये घडला आहे.

कोलकात्याहून मुंबईकडे येणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि खाद्य पदार्थ एमआरपी पेक्षा जास्त किमतीत देत असल्याची तक्रार केल्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्याला आयआरटीसी कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गीतांजली एक्सप्रेस मध्ये बडनेरा ते नागपूर दरम्यान ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

अंबरनाथ येथे राहणारे सत्यजित बर्मन हे गीतांजली एक्सप्रेसमधून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी गीतांजली एक्सप्रेसमधून आयआरटीसीकडून खाद्य पदार्थ विक्री करण्यात येत होती. परंतु एक्सप्रेसमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या या एमआरपी पेक्षा जास्त किंमतीत विकल्या जात असल्याचे बर्मन यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत विचारणा करत या प्रकरणी तक्रार देखील केली. 

रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल 

मात्र तक्रार केल्यावरून या कर्मचाऱ्यांनी बर्मन यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. या वादातूनच त्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता सत्यजित बर्मन यांनी कल्याण रेल्वे स्थानकात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार कल्याण रेल्वे पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करत सदर गुन्हा हा बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे आयआरटीसी कर्मचाऱ्यांची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT