Ganpat Gaikwad Viral Video saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: भाजप आमदाराच्या आवाजाऐवजी जोडला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज, व्हिडिओ व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजीत देशमुख, साम टीव्ही

Ganpat Gaikwad Viral Video: कल्याण पूर्वेतील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अधिकाऱ्यांसोबत बोलत असतानाचा त्यांचा व्हिडियो एडिट करून श्वानाच्या भुंकण्याचा आवाज टाकून हा व्हिडिओ अज्ञात इसमाकडून व्हायरल करण्यात आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हा व्हिडिओ एडिट आणि व्हायरल करून आमदार गणपत गायकवाड यांची बदनामी करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी कल्याण कोळशेवाडी पोलिसांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

काही दिवसापूर्वी वाढदिवसाचे बॅनर काढल्याप्रकरणी कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी भर रस्त्यात पालिका अधिकाऱ्याचा सत्कार केला. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत परिसरातील नाले सफाईची पाहणी केली.

यावेळी आमदार गायकवाड अधिकाऱ्यांशी चर्चा करत असतानाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता. हाच व्हिडियो अज्ञात इसमाने एडिट करून त्यात कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज टाकून व्हायरल केला आहे. हा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. (Breaking News)

त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत निवेदन दिले. आमदार गणपत गायकवाड यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी या निवेदनातून कार्यकर्त्यांनी केली आहे. (Latest Political News)

तसेच लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. असे कृत्य करणाऱ्याला भाजप माफ करणार नाही, असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT