Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी वाढ; खाडी किनाऱ्या लगतच्या तबेल्यात शिरले पाणी, गोविंदवाडी बायपासवर वाहतूक कोंडी

Kalyan News : पावसामुळे कल्याण खाडीतील पाणी पातळी वाढून परिसरात जात आहे. यामुळे येथे अडकलेल्याना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू करून रात्री बाहेर काढण्यात आले.

Rajesh Sonwane

संघर्ष गांगुर्डे
कल्याण
: कल्याण शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल सायंकाळी कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे खाडी किनाऱ्यावरील वस्तीत देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. तर या परिसरात २० ते २५ तबेले देखील असल्याने अचानक पाणी वाढल्याने तबेल्यांमध्ये शेकडो म्हशी अडकल्या होत्या. दरम्यान गोविंदवाडी बायपासवर देखील वाहतूक कोंडी झाली आहे. 

कल्याण खाडीच्या पाणी पातळीत मुसळधार पावसामुळे वाढ झाली आहे. खाडीतील पाणी आजूबाजूच्या परिसरात जात असल्याने परिसरात पानीचपणी झाले आहे. खाडीच्या बाजूला असलेल्या तबेल्यात देखील पाणी शिरल्याने यात म्हशी अडकल्या होत्या. तर पालिका प्रशासन, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने घरात अडकलेले रहिवासी आणि तबेल्यातील ५०० हून अधिक म्हशींचे रेस्क्यू करून रात्री बाहेर काढण्यात आले. 

परिसरातील नागरिकांना शाळा, समाजमंदिरात हलविले 

रात्रभर खाडी किनाऱ्यावरील वस्तीत पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना शाळा, समाज मंदिर तसेच नातेवाईकांच्या घरी हलवण्यात आले होते. मात्र या म्हशींना ठेवायचे कुठे? हा प्रश्न उपस्थित होत असल्याने अखेर या तबेलातून बाहेर काढलेल्या ५०० हून अधिक म्हशींना गोविंदवाडी बायपास रस्त्यावर बांधण्यात आले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी म्हशी बांधण्यात आले होते.  

रस्त्यावरील म्हशींमुळे वाहतूक कोंडी 

तर रात्रभर तिथे ठेवल्यानंतर पहाटे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झाल्याने या म्हशींमुळे मोठा ट्रॅफिक जाम निर्माण झाली आहे. काही काळ वाहन चालकांची गैरसोय झाली. सध्या पावसाला विश्रांती मिळाल्याने खाडी पात्रातील पाणी ओसरत आहे. पाणी ओसरल्याने वस्तीत शिरलेल्या पाण्याचाही निचरा झाला आहे. परिणामी तबेला मालकांनी म्हशी पुन्हा तबेल्यात नेण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील जांभूळवाडी तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Dream Astrology: स्वप्नात 'या' गोष्टी दिसणं असतं शुभ, धनलाभागाचे मिळतात संकेत

Sindhudurg Tourism : हिवाळ्यात सिंधुदुर्गमधील 'हे' अनोखं ठिकाण पाहा, आयुष्यभर ट्रिप विसरणार नाही

Sangli : सांगलीत 'मुळशी पॅटर्न'! दलित महासंघाच्या अध्यक्षांच्या हत्येनंतर आणखी एकावर हल्ल्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Politics: भाजपचा मास्टरस्ट्रोक, NCP शरद पवार गटाला झटका; बड्या नेत्यासह सरपंच-उपसरपंचांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT