Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : केडीएमसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातील कंत्राटी कामगाराने संपविले जीवन

KDMC : याप्रकरणी टिटवाळा पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी पाठवला

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण जवळील मोहेली परिसरात असलेल्या केडीएमसीच्या जलशुद्धीकरण केंद्रात कंत्राटी कामगाराने (Kalyan) आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास समोर आली. दुर्गाप्रसाद वर्मा असे या कंत्राटी कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी (Police) पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

जलशुद्धीकरण केंद्रात दुर्गाप्रसाद वर्मा गेल्या दहा वर्षापासून ऑपरेटर पदावर काम करत होता. नेहमीप्रमाणे दुर्गाप्रसाद काल रात्रीच्या सुमारास रात्रपाळीसाठी कामावर आला. या दरम्यान त्याने केडीएमसीच्या जलशुद्धीकरण केंद्रात गळफास घेत आत्महत्या केली. सोबत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर याप्रकरणी टिटवाळा पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी पाठवला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल?

मृतदेहाचा पंचनामा करून पोलीसांकडून याप्रकरणी तपास सुरु केला आहे. दुर्गाप्रसाद वर्मा याने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु पोलीस तपासात आत्महत्येचे कारण समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार प्रकरणात दोन आरोपी ताब्यात

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

Chhatrapati Sambhajinagar Tourism: छत्रपती संभाजीनगरपासून फक्त ६ तासांच्या अंतरावर आहे हे मनमोहक हिल स्टेशन, या विकेंडला प्लान कराच!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठवे वेतन आयोग आणि जुन्या पेन्शनबाबत महत्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT