Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : बॉडीगार्ड म्हणून कार्यक्रमात फिरायचा; पोलिसांनी तपासणी केली असता धक्कादायक माहिती आली समोर

Kalyan News : कल्याण खडकपाडा पोलिसांना एका खाजगी बॉडीगार्डकडे बंदुकीचा बनावट परवाना असल्याची माहिती मिळाली होती

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: बनावट परवानाच्या आधारे बंदूक मिळवून बॉडीगार्डचे काम करणाऱ्याला कल्याण खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. छत्तीसगड येथून बंदुकीचा बनावट परवाना बनवला होता. या परवानाच्या आधारे विविध कार्यक्रमांमध्ये बाऊन्सर आणि बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. मात्र पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासणी केली असता त्याचा हा बनावट परवान्यांचा कारनामा समोर आला आहे. 

छत्तीसगड राज्यातील विलासपूर येथील मूळ रहिवाशी असलेला संतोष गोस्वामी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान कल्याण खडकपाडा पोलिसांना (Khadakpada Police) एका खाजगी बॉडीगार्डकडे बंदुकीचा बनावट परवाना असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांच्या पथकाने संतोष गोसावी यांना ताब्यात घेतलं. त्याच्या बंदुकीच्या परवान्याचे तपासणी केली असता परवाना बनावट असल्याचे (Kalyan) समोर आले. खडकपाडा पोलिसांनी तत्काळ संतोष गोस्वामी याला बेड्या ठोकल्या. तपासादरम्यान संतोष गोस्वामी याने छत्तीसगड येथून बंदुकीचा बनावट परवाना बनवला होता. 

१२ बोअरची बंदूक जप्त 

बनावट परवान्याच्या आधारे त्याने एक १२ बोअरचे रायफल देखील घेतली होती. बंदुकीच्या बनावट लायसन्सच्या आधारे संतोष गोस्वामी हा विविध कार्यक्रमांमध्ये बाऊन्सर आणि बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. संतोषकडून पोलिसांनी १२ बोअरची बंदूक जप्त केली आहे. तसेच संतोष याने बंदुकीचे बनावट लायसन्स कुठून आणि कुणाकडून बनवले, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pushpa 2 Actor News: पुष्पा चित्रपटाचा स्टार अभिनेता अडचणीत! महिलेने केले लैंगिक शोषणाचे आरोप

Shirur News : धक्कादायक..सोने चोरीसाठी तोडला महिलेचा कान; दरोडेखोरांचे भयानक कृत्य

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

Ballot Paper Voting : EVM नकोच, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात; काँग्रेस, ठाकरे-पवार गट एकवटले

SCROLL FOR NEXT