Wardha News : दुचाकी अनियंत्रित होऊन पुलावरून गेली खाली; पुराच्या प्रवाहात दोघे बेपत्ता

Wardha News : दोन दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नद्यांना पूर आला असल्याने बहुतांश रस्त्यांवर पुराचे पाणी वाहत आहे.
Wardha News
Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास 

वर्धा : विदर्भातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्यान वर्धा जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. अशातच पुलगाव येथे पुराच्या पाण्यात दुचाकी वाहून गेल्याची घटना घडली आहे. पुलावरून जाताना दुचाकी अनियंत्रित होऊन पुलाच्या खाली कोसळल्याने दुचाकीवरून महिला आणि पुरुष दोघेही बेपत्ता असल्याची माहिती आहे. 

Wardha News
Nandurbar News : थरारक..रात्रीच्या अंधारात रस्त्याचा अंदाज चुकला; पुराच्या पाण्यात कार वाहिली, सुदैवाने दोघांचे प्राण वाचले

दोन दिवसांपासून (Wardha) वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नद्यांना पूर आला असल्याने बहुतांश रस्त्यांवर पुराचे पाणी वाहत आहे. याच दरम्यान जिल्ह्यातील पुलगाव येथील नदीवर असलेल्या पुलावर दुर्घटना घडली आहे. यात पुलगाव येथील वर्धा नदीच्या (Wardha River) लहान पुलावर दुचाकीने जातं असतांना दुचाकी अनियंत्रित होऊन थेट पुलाखाली गेली. नदीला पूर असल्याने यात दुचाकीसह दोघेजण वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. दुचाकीवर महिला व पुरुष पुलगाव येथून विटाळा येथे जातं होते. घटनास्थळी पोलिसांसह महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. तर आपत्ती व्यवस्थापन पथक शोधकार्यासाठी दाखल झाले आहेत. 

Wardha News
Ekburji Dam : वाशिमकरांसाठी खुशखबर, एकबुर्जी धरण काठोकाठ भरलं; पाहा आजची ताजी आकडेवारी

दोन वर्षांपासून पूल वाहतुकीसाठी बंद 

सदर पूल हा मागील दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी बंद केला आहे. हा पूल वर्धा आणि अमरावती जिल्ह्याला जोडणारा असून पुलगाव ही बाजारपेठ, रुग्णालय आणि विद्यालय असल्याने या ठिकाणी यायला बाजूच्या जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या नागरिकांना सोयीस्कर पडते. या ठिकाणी नवीन पूल बनावा म्हणून बांधकाम विभागाने नवीन पुलाचा प्रस्ताव आणि डिजाईन बनवल आहे. याबाबत ३५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा; म्हणून मागील दोन वर्षांपासून राज्य सरकारला स्थानिक काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी निधी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली. मात्र बजट मध्ये निधीची तरतूद राज्य सरकारने करण्यात आली नाहीय परिणाम या धोकादायक पुलावरून नागरिक प्रवास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com