Ekburji Dam : वाशिमकरांसाठी खुशखबर, एकबुर्जी धरण काठोकाठ भरलं; पाहा आजची ताजी आकडेवारी

Washim News : वाशीम शहरापासून जवळ असलेल्या एकबुर्जी धरणातील पाणी साठा कमी झालेला होता. पावसाळा सुरु झाल्यानंतर धरणाच्या पाणी पातळीत काहीशी वाढ होण्यास सुरवात
Washim News
Washim NewsSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशीम जिल्ह्यात रविवारी सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान वाशिम शहराची तहान भागवणारे एकबुर्जी धरण देखील या पावसाने ९० टक्के भरले आहे. यामुळे वाशीमकरांच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे. 

Washim News
Nandurbar News : थरारक..रात्रीच्या अंधारात रस्त्याचा अंदाज चुकला; पुराच्या पाण्यात कार वाहिली, सुदैवाने दोघांचे प्राण वाचले

वाशीम (Washim) शहरापासून जवळ असलेल्या एकबुर्जी धरणातील पाणी साठा कमी झालेला होता. पावसाळा सुरु झाल्यानंतर धरणाच्या पाणी पातळीत काहीशी वाढ होण्यास सुरवात झाली. मात्र निम्मा पावसाळा उलटून गेल्यावरही धरण भरणार की नाही? ही चिंता वाशिमसह परिसरातील नागरीकांना लागली होती. मात्र, कालपासुन सुरू असलेल्या धुव्वाधार (Rain) पावसामुळे धरण ९० टक्के भरले आहे. त्यामुळे सिंचन तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसुन येत आहे.

Washim News
Waghur River Flood : २० वर्षानंतर वाघूर नदीला मोठा पूर; पुलावरून पाणी जात असल्याने वाकोद- तोंडापूरचा संपर्क तुटला

धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता 

रविवारी वाशीम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन धरण ९० टक्के भरले आहे. तर पावसाचा जोर अजून एक- दोन दिवस असाच कायम राहिल्यास सकाळपर्यंत धरण ओव्हर फ्लो होण्याची दाट शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com