Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : मातोश्री बाहेरील मराठा आंदोलनात भाजपचे पदाधिकारी सहभागी; ठाकरे गट आक्रमक, कारवाईची केली मागणी

Kalyan News : मातोश्री बाहेर करण्यात आलेल्या मराठा आंदोलनात कल्याणमधील भाजप पदाधिकारी सहभागी असल्याचे पाहण्यास मिळाले

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: मुंबईत उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री बाहेर मराठा आंदोलकांनी आंदोलन केले. या आंदोलनात कल्याणमधील भाजप पदाधिकारी सुशील पायाळ सहभागी झाल्याचे दिसून आले. यामुळे ठाकरे गट आक्रमक झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. 

मातोश्री बाहेर करण्यात आलेल्या मराठा आंदोलनात कल्याणमधील (BJP) भाजप पदाधिकारी सहभागी असल्याचे पाहण्यास मिळाले. या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा समनव्यक हर्षवर्धन पालांडे यांनी केला होता. याबाबत आज ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी (Kalyan) कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये, आंदोलनात असे घुसखोर या संधीचा फायदा घेऊन मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले. 

कारवाई करण्याची मागणी 

ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून मातोश्रीला बदनाम करण्याचे षडयंत्र भाजप करत आहे हे सिद्ध होतं. त्या आंदोलनात कोण होते, ते मराठा आंदोलक होते का? ते भाजपचे होते का? त्यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे? याचा शोध घेऊन कारवाई करावी; अशा मागणीचे निवेदन पोलिसांना दिले आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील एचएनडी जैन बोर्डींग आणि गोखले बिल्डर यांच्यामधील आर्थिक व्यवहार अखेर रद्द

Saturday Horoscope: नोकरी व्यवसायात मिळेल यशच यश, रखडलेली कामे पूर्ण होणार, वाचा राशीभविष्य

Mumbai: जंगलाची राणी पुन्हा येतेय! 'वनराणी' टॉय ट्रेन लवकरच धावणार, फुलपाखराच्या आकाराचं स्टेशन अन्...

252 कोटींचं ड्रग्ज कनेक्शन उघड; दाऊदचा भाचा, श्रद्धा कपूरच्या नावाचा समावेश, मनोरंजन विश्वात खळबळ|VIDEO

Chanakya Niti: तुमच्या चांगुलपणाचा फायदा तर घेत नाहीत ना? चाणक्यांनी सांगितली माणसं ओळखण्याची ट्रिक

SCROLL FOR NEXT