Kalyan Police Station Saam TV
महाराष्ट्र

Kalyan Crime News: कल्याणमध्ये दोन गटांमध्ये राडा; गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न. दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

Kalyan Latest News: कल्याण पूर्व येथील खडेगोळवली परिसरातील साईनगर येथे दोन टोळ्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली.

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख
कल्याण
: कल्याण पूर्वेत सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये जोरदार राडा झाला. दहशत पसरवण्यासाठी या टोळक्याने रस्त्यात उभे असलेल्या चार ते पाच गाड्यांची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत याप्रकरणी दोन जणांना अटक केली. तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. 

कल्याण (Kalyan) पूर्व येथील खडेगोळवली परिसरातील साईनगर येथे दोन टोळ्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. नायडू गॅंग व दही चुहा गँग या टोळ्यांमध्ये वर्चस्वाच्या लढाईतून हा राडा केला. या राड्या दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या कार, रिक्षा, दुचाकी अशा चार ते पाच गाड्यांची तोडफोड (Crime News) केली आहे. घटनेची माहिती मिळताच राजकीय पदाधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. 

कल्याण पूर्वेत खडेगोळवली परिसरात नायडू गँग आणि आणि दही गँग यांच्यात वाद आहे. या दोन्ही गॅंगमधील अनेक संशयित सध्या जेलमध्ये आहेत. कोळशेवाडी (Police) पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तुषार वाल्मिकी व अरविंद नायडू या दोन जणांना अटक केली आहे. या दोघांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर पोलीस इतर आरोपींच्या शोध घेत आहेत. कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी या सर्व आरोपी विरोधात एनपीडीए व मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT