Electricity Theft Saam tv
महाराष्ट्र

Electricity Theft : टिटवाळा उपविभागात सापडले १४७ वीज चोर; ६० जणांवर गुन्हे दाखल, महावितरणची कारवाई

Kalyan News : महावितरणकडून अधिकृत वीज कनेक्शन घेऊन मीटरमध्ये छेडछाड करून विजेची चोरी केली जात असते. तर काही जण थेट आकडा टाकून विजेचा अनधिकृत वापर करत असल्याचे समोर आले

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख
कल्याण
: विजेची चोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणने धडक कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार महावितरणच्या टिटवाळा उपविभागात जून महिन्यात मांडा, गावेली, कोन आणि खडवली शाखा कार्यालयांतर्गत छापे टाकत १४७ जणांवर धडक कारवाई करून ५९ लाख २४ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. या प्रकरणी वीज बिले मुदतीत भरणा न करणाऱ्या ६० जणांविरोधात मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महावितरणकडून (Mahavitaran) अधिकृत वीज कनेक्शन घेऊन मीटरमध्ये छेडछाड करून विजेची चोरी केली जात असते. तर काही जण थेट आकडा टाकून विजेचा अनधिकृत वापर करत असल्याचे समोर आले आहे. तर काही जण विजेचा वापर करून त्याचे बिल भरणा करत नाही. अशांविरोधात महावितरणने धडक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार टिटवाळा उपविभागात धाड टाकून वीज चोरी (Electricity Theft) पकडण्यात आली आहे. 

अशी करण्यात आली कारवाई 

महावितरण पथकाच्या या मोहिमेत मांडा- टिटवाळा शाखा कार्यालयांतर्गत ५० जणांकडे १८ लाख ५३ हजार ५१० रुपये, कोनगाव शाखा परिसरातील ४३ जणांकडे २८ लाख ७८ हजार १६० रुपये, गोवेली शाखा कार्यालयाच्या अंतर्गत २८ जणांकडे ९ लाख ५१ हजार ५३० रुपये आणि खडावली शाखा परिसरातील २६ जणांकडे २ लाख ४० हजार ८८० रुपयांची वीजचोरी आढळून आली. या सर्वांना वीजचोरीचे देयक व तडजोड रक्कम भरण्याबाबत‍ नोटिस बजावण्यात आली. विहीत मुदतीत सदर रकमेचा भरणा टाळणाऱ्या ६० जणांविरुद्ध दिलेल्या फिर्यादनुसार मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1947 Grocery Price: साखर, मीठ, तेल आणि सोनं...१९४७ मध्ये 'या' गोष्टींची किंमत किती होती?

Maharashtra Live Update: अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीला रात्री करा हे ५ उपाय, घरात नांदेल सुख- शांती

मालेगावात मटण-चिकन शॉप बंद, पालिकेच्या आदेशाचं कडेकोट पालन, VIDEO

Shocking : धक्कादायक! ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT