Akola News : विद्युत तारांना स्पर्श होऊन बैलजोडी दगावली; शेतातून परतताना घडली घटना

Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोटमधील उमरा येथील शेतकरी हरिदास सदाफळे हे सोमवारी शेतीकामासाठी गेले होते.
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

अक्षय गवळी  

अकोला : ऐन हंगामात शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे. शेतातून काम करून परततांना विद्युत रोहिणीच्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन शेतकऱ्याच्या बैलजोडी दगावली आहे. सदरची घटना अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील उमरा शेतशिवारात घडली. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

Akola News
Wardha Police : उडीसा येथून गांजा तस्करी; १०२ किलो गांज्यासह एकाला अटक, वर्धा पोलिसांची कारवाई

अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोटमधील उमरा येथील शेतकरी हरिदास सदाफळे हे सोमवारी शेतीकामासाठी गेले होते. दिवसभर बैलजोडीच्या मदतीने शेतातलं काम केल्यानंतर सायंकाळी काम आटोपून घराकडे जान्यासाठी निघाले. या दरम्यान रस्त्यात एका विद्युत रोहिणीला बैलजोडीचा स्पर्श झाला. यामुळे जोरदार विजेचा धक्का लागल्याने यात शेतकरी (Farmer) सदाफळे यांची बैलजोडी जागीच दगावली आहे. सुदैवाने या घटनेत शेतकरी सदाफळे बचावले आहेत. 

Akola News
RTO Action : विना हेल्मेट वाहन चालवणे पडले महागात; एकाच महिन्यात आरटीओकडून ९ लाखाचा दंड वसूल

बैलजोडीवरच उदरनिर्वाह 

विशेष म्हणजे सदाफळे यांचा उदरनिर्वाह हा बैलजोडीवर अवलंबून होता. बैलजोडीच्या आधारावर ते इतर शेतकऱ्यांच्या शेतातले काम करायचे. त्यातून मिळणाऱ्या मजुरीच्या पैशातून त्यांचा उदरनिर्वाह चालत होता, परंतु आज शेतशिवारातून जात असताना त्यांनी बैलजोड़ी गमावली आहे. जवळपास १ लाख २० हजार रूपयांचं त्यांचं नुकसान झाले आहे, आता तातडीने शासनाने मदत द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com