Ravindra Chavan Saam tv
महाराष्ट्र

Ravindra Chavan News : ठाणे जिल्ह्यात ग्रामीण रस्त्यांसाठी ११५६ कोटींचा निधी; मंत्री रवींद्र चव्हाण

Kalyan News : नव्याने रस्ता बांधणीसाठी आलेल्या निधी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची माहिती देण्याबाबत आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेतली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्त्यांसाठी तब्बल ११५६ कोटींचा निधी मंजूर (Kalyan) करण्यात आला आहे. या कामांची सुरुवात करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आज डोंबिवलीत पत्रकार परिषदेत दिली. (Live Marathi News)

ठाणे (Thane) जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्त्यांचे तसेच नव्याने रस्ता बांधणीसाठी आलेल्या निधी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची माहिती देण्याबाबत आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, भिवंडी ग्रामीण, भिवंडी, मुरबाड, शहापूर, कल्याण, पश्चिम कल्याण ग्रामीण, अंबरनाथ, उल्हासनगर आदी भागात रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याचे सांगितले. ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच आमदारांना रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून निधी देण्यात आला असून रस्ते सुस्थितीत राहावेत व दर्जेदार कामे व्हावी, त्याकडे शासनाचा भर असल्याचे देखील चव्हाण यांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन ठिकाणी लॉ कॉलेजला परवानगी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचे सरकार आल्यानंतर राज्यातील विकास कामांना गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डोंबिवली परिसरात लॉ कॉलेजचे मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर जोंधळे कॉलेज, जोशी हायस्कूल दोन ठिकाणी लॉ कॉलेजसाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगितले. शहरात लॉ कॉलेज नसल्याने अनेक जणांना उल्हासनगर, मुंबईच्या दिशेने शिक्षणासाठी जावं लागत होतं. आता ही व्यवस्था शहरात झाल्याने शहरातील विद्यार्थ्यांना लाभ होईल; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मराठी माध्यमाच्या शाळांबाबत देखील शासनाकडून सकारात्मक पावले उचलले जात असल्याची माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT