Kalyan Politics Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Politics: काँग्रेसच्या बॅनरबाजीला शिंदे गटाच्या आमदाराचं सडेतोड उत्तर; म्हणाले,'कामे करून...'

Kalyan Political News: बॅनरबाजीवर कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Kalyan News: 'काँग्रेसचे नेते काम करून घेतात आणि टीका पण करतात ही दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली. 'पालकमंत्री हरविले आहेत, कल्याणला येताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांना घेऊन यावे, असा बॅनर कल्याण काँग्रेसने लावून भाजप-शिवसेनेला डिवचले होते. आता या बॅनरबाजीवर कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. (Latest Marathi News)

कल्याण (Kalyan) पश्चिमचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले, 'पालकमंत्री शंभूराज देसाई हे मंत्री आहेत. त्यांच्याकडे ठाणे व सातारा पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे थोडाफार इकडे तिकडे होत असेल. मात्र नियोजन समितीच्या प्रत्येक बैठकीला पालकमंत्री हजर असतात. लोकांना भेटत नाही हे थोडेफार जाणवत असेल. मात्र पुढे जाऊन त्यात सुधारणा होईल मात्र ते हरवले आहे असं बोलणं चुकीचं होईल'.

'मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा आम्ही असतो, तेव्हा कोणी ना कोणी काँग्रेसचा माणूस आम्हाला भेटत असतो. कोणते ना कोणते काम करण्यासाठी सह्या घेण्यासाठी ते आलेले असतात. ही बाब बोलताना आमदार भोईर यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला किस्सा सांगितला.

'नाना पाटोले एकदा मुख्यमंत्र्यांकडे सही घेण्यासाठी आले, तेव्हा मुख्यमंत्री यांनी तुम्ही तर आम्हाला सोडून गेले.आता माझ्या सहीची काय आवश्यकता? तुम्ही मोठ्या मोठ्या बाता करता, असे पटोले यांना बोलले नंतर सही केली. एकूणच काँग्रेसचे नेते काम करून घेतात आणि टीका पण करतात. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका विश्वनाथ भोईर यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचा धुरळा; ८ दिवसांत १७ जागांवर निवडणुका लागण्याची शक्यता

Diabetes Testing : ब्लड शुगर लेव्हल तपासण्याची योग्य वेळ कोणती? मिळेल अचूक रीडिंग

NEET 2026: मोठी बातमी! अखेर 'नीट' परीक्षा रद्द; पेपरफुटीची CBI चौकशी होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Pahadi Mangalsutra Design: लग्नासाठी काहीतरी हटके हवंय? ट्राय करा पहाडी मंगळसूत्राचे हे 5 पॅटर्न, नवरीचा लूक दिसेल रॉयल

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या अपार्टमेंटमधून मारूती स्विफ्ट गाडीची चोरी, चोरीची घटना CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT