Kalyan MNS News  Saam TV
महाराष्ट्र

Kalyan News: स्वयंपाक करताना गॅस सिलिंडरचा भडका उडाला; मनसेच्या शहराध्यक्षा गंभीर जखमी

Kalyan MNS News: शीतल विखणकर असं जखमी झालेल्या मनसे महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे.

Satish Daud

अभिजित देशमुख साम टीव्ही | कल्याण, १६ डिसेंबर २०२३

Kalyan MNS News

स्वयंपाक करीत असताना गॅसच्या गळतीमुळे किचनमध्ये अचानक आग लागली. या आगीत कल्याण येथील मनसेच्या महिला शहराध्यक्षा गंभीर जखमी झाल्या आहेत. कुटुंबियांनी त्यांना तातडीने उपचारासाठी ऐरोली येथील रुग्णालयात दाखल केलं आहे. शीतल विखणकर असं जखमी झालेल्या मनसे महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, शीतल विखणकर या कल्याण खडकपाडा परिसरातील कल्पेश अपार्टमेंट मध्ये राहतात. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे किचनमध्ये स्वयंपाक बनवत होत्या. त्यांचे कुटुंबीय समोरील हॉलमध्ये गप्पा मारीत होते.

दरम्यान, स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस बंद झाला. यानंतर शीतल यांनी पुन्हा लायटरने गॅस पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्षणात आगीचा भडका उडाला आणि या आगीत शीतल गंभीर जखमी झाल्या. घरात आरडाओरड होताच कुटुंबातील इतर सदस्यांनी किचनच्या दिशेने धाव घेतली.

किचनमध्ये लागलेली आग कुटुंबियांनी कशीबशी विझवली. त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या शीतल यांना उपचारासाठी ऐरोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शीतल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी मनसे कार्यकर्ते प्रार्थना करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari: ४४ वर्षाच्या श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते फिदा

Maharashtra Rain Live News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

SCROLL FOR NEXT