Kalyan Gas Leakage  saam tv
महाराष्ट्र

Kalyan Gas Leakage : कल्याणमध्ये गॅस गळती होऊन स्फोट; दोन महिला जखमी

कल्याण पश्चिम येथील एका इमारतीत गॅसगळती झाल्यामुळे स्फोट झाल्याची घटना घडली आहे.

प्रदीप भणगे

Kalyan News : कल्याण पश्चिम येथील एका इमारतीत गॅसगळती झाल्यामुळे स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 'सर्वोदय हाईट्स' असे इमारतीचे नाव आहे. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण (Kalyan) पश्चिम येथील आरटीओ सर्वोदय हाईट्स इमारतीच्या पहिल्या माळ्यावर गॅसगळती झाल्यामुळे स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन महिला जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

अग्निशमन दलाच्या जवांनानी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, मोठ्या प्रमाणात गॅसची गळती होत असल्याने इमारतीत पाणी मारून अग्निशमन दलाने गळतीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून सिलेंजरची गळती थांबवत गळतीवर नियंत्रण आणले.

या घटनेत सुखविंदर कौर, कलवंत कौर अशी जखमी महिलांची नाव असून दोघी सासू-सून आहेत. याच दरम्यान घरात बेडरूममध्ये महिला व तिचे दीड महिन्याचा बाळ होते. मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. स्फोटात किचनचे नुकसान झाले आहे. घरी स्वयंपाक करताना गॅसगळतीमुळे ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गॅसगळतीमुळे हा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

Independence Day Marathi Speech : १५ ऑगस्टला भाषण देताय? हे 10 मुद्दे लक्षात ठेवा; भाषण ऐकून सर्वच करतील कौतुक!

SCROLL FOR NEXT