kdmc swine flu news
kdmc swine flu news  saam tv
महाराष्ट्र

swine flu | नागरिकांची चिंता वाढली! कल्याण-डोंबिवलीत स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू

प्रदीप भणगे

डोंबिवली : ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढ कमी झाल्यानंतर आता स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यात ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा (Swine Flu) प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मंगळवारी, कल्याण-डोंबिवलीत आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर कल्याण डोंबिवली मध्ये स्वाईन फ्लू मुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती केडीएमसीचे अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. (Kalyan Dombivali News)

काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव वाढताना दिसत आहे. तसेच कल्याण-डोंबिवलीत मध्येही स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव वाढत आहे.आतापर्यंत केडीएमसी क्षेत्रात स्वाईन फ्लू मुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यातील एक जण कल्याण पश्चिम मधील रहिवासी,तर एक डोंबिवली मधील रहिवासे होते.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली आतापर्यंत ४८ जणांना फ्लूची लागण झाली आहे. तर स्वाईन फ्लू रुग्णामधील २९ जण बरे झाले आहेत. तसेच रुग्णायात अजून १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनानंतर स्वाईन फ्लूचे रुग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळून येऊ लागल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Voting Live: राज्यातील मतदारसंघतील ११ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी आली समोर

Nandurbar Crime : रस्त्यावर अडवून लूटमार; व्यापाऱ्याजवळची ४५ हजारांची रोकड घेऊन झाले फरार

Eknath Shinde: श्रीकांत शिंदे हॅट्रिक करणार, रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होणार; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

Sunil Raut On BJP | मुंबईत ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात! सुनील राऊत महत्त्वाचं बोलले

IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेसह या दिग्गज खेळाडूंची कारकिर्द संपली?

SCROLL FOR NEXT