school News Saam TV
महाराष्ट्र

KDMC: शाळा एकाच दुकानातून साहित्य घेण्याची सक्ती करतंय? केडीएमसी शिक्षण विभागाने काढला महत्वाचा आदेश

पालकांवर शाळांना अशी सक्ती करता येणार नाही अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या शिक्षण विभागाने काढले आहेत.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Kalyan News: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील काही खाजगी शाळांकडून पालकांवर सक्ती केली जाते. शाळांनी सुचविलेल्या विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य करा, अशी सक्ती शाळा प्रशासनाकडून केली जाते. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेचे शिक्षण मंडळ ॲक्शन मोडवर आले आहे.

काही शाळांमध्ये जावून याबाबत शहानिशा केली दोन शाळांना याबाबत नोटीस देखील देण्यात आली आहे. याबाबत पालकांवर शाळांना अशी सक्ती करता येणार नाही अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या शिक्षण विभागाने काढले आहेत. (Latest Marathi News)

शिक्षण मंडळ प्रशासनाने हे आदेश कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व अनुदानी आणि विना अनुदानीत खाजगी शाळांना काढले आहे. महापालिका हद्दीत महापालिकेच्या ६० शाळा आहेत. त्या व्यतिरिक्त महापालिका हद्दीत ३०० पेक्षा जास्त प्राथमिक, माध्यमिक शाळांची संख्या आहे. यामध्ये बहुतांश शाळा (School) या खाजगी विना अनुदानित आहे. त्यातही इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा भरणा जास्त आहे.

या खाजगी शाळांकडून पुस्तके, शालेय साहित्य, गणवेश आदी शाळेने सुचविलेल्या दुकानातूनच घ्या अशी सक्ती पालकांना केली जाते.तसेच काही शाळांनी तर शालेय साहित्य विक्री करणारे दुकाने शाळेच्या शेजारी शाळेच्या आवारात थाटली आहेत. शाळेकडून सुचविलेल्या दुकानदार हे जास्तीच्या किंमतीत शालेय साहित्य विकतात.

काही वेळेस त्यांच्याकडे गणवेश, शालेय साहित्य आणि पाठय़क्रमातील पुस्तके उपलब्ध नसतात. ती अन्य दुकानात उपलब्ध असताना ती पालकांना त्यांच्या मुलांसाठी खरेदी करता येत नाही. शालेय साहित्य विक्रीतील ही मक्तेदारी शाळांकडून पोसली जात आहे.

या प्रकरणी कल्याण मधील काँग्रेस पदाधिकारी विनोद तिवारी यांनी यांनी राज्य सरकारच्या २००४ सालच्या आदेशाचा आधार घेत सरकारनेच अशा प्रकारची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पालकांवर सक्ती करता येणार नाही असे म्हटले आहे ही बाब शिक्षण विभागला निदर्शनास आणून देत निवेदन दिले होते .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; 5 आरोपींना मुंबई गुन्हे शाखा उद्या कोर्टात हजर करणार

Thursday Horoscope: धनलाभाचे योग अन् नात्यांत गोडवा; या ४ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना 500 कोटी दिले? जरांगे आरोपांचे पुरावे देणार?

शूटर १५ तासांत जेरबंद पण मास्टरमाइंड कोण? टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर

दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT