Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : घरात घेऊन जात गतिमंद मुलींचा विनयभंग; कल्याणमधील संतापजनक घटना, नराधम ताब्यात

Crime News Kalyan: घराच्या परिसरातील अंगणात खेळत होती. नराधमाची नजर तिच्यावर पडली. मुलीला घरात बोलवुन घेतले. सदर मुलगी घरात आल्यानंतर त्याने घराचे दार बंद करत तिच्याशी अश्लील चाळे केले

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: मुलींचा विनयभंग तसेच अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. यातच कल्याण जवळील मोहने गाळेगाव परिसरात एका १५ वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलीचा एका इसमाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत विनयभंग करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

कल्याण जवळील मोहने गाळेगाव परिसरात सदर गतिमंद मुलगी आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. ही मुलगी बुधवारी आपल्या घराच्या परिसरातील अंगणात खेळत होती. याच वेळी सुनील पवार या नराधमाची नजर तिच्यावर पडली. सुनील पवार याने तिला घरात बोलवुन घेतले. सदर मुलगी घरात आल्यानंतर त्याने घराचे दार बंद करत तिच्याशी अश्लील चाळे केले. 

बंद घरात आढळली मुलगी 

दरम्यान बराच वेळ झाल्यानंतर मुलगी दिसत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेण्यास सुरवात केली.  शोध घेत असताना सुनीलचे घर आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. यामुळे कुटुंबियांना सुनील याच्यावर संशय आला. यामुळे त्यांनी सुनीलचा दरवाजा ठोकवला, मात्र दरवाजा बंद होता. अखेर या दरवाजाचा टाळा तोडून कुटुंबीय घरात गेले असताना घरात मुलगी आढळून आली.

गुन्हा दाखल करत आरोपी ताब्यात 

परिवाराने मुलीला बाहेर काढले. तसेच तिला विचारपूस केली असता घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी कुटुंबीयांनी तत्काळ टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी सुनील पवार विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. तर त्याला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पेणमध्ये दिव्यांग मुलांनी फोडली दहीहंडी; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

Salman Khan: 'हे तुझं काम नाही..'; बिग बॉस २०च्या प्रीमियर शूटिंगदरम्यान सलमान खान संताप, व्हिडिओ व्हायरल

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत

Pune News: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, डीजे प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीपातळी ९५.८९ टक्क्यांवर , सातही धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा शिल्लक?

SCROLL FOR NEXT