Kalyan Crime News Saam TV
महाराष्ट्र

Kalyan Crime News : मालकाच्या पत्नीवर वाईट नजर; कामावरून काढणार असल्याचं कळताच नोकराने केलं भयानक कांड

Titwala Crime News : कल्याणजवळील टिटवाळा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Satish Daud

अभिजित देशमुख, साम टीव्ही

Kalyan Crime News : कल्याणजवळील टिटवाळा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इलेक्ट्रिक दुकानात काम करणाऱ्या नोकरानेच आपल्या मित्रांच्या साथीने मालकाची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर त्याने मृतदेह जमिनीत पुरला. कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्यावर मेलेल्या म्हशीचा मृतदेह टाकला. मात्र, दोन दिवसानंतर मृतदेह फुगून हात बाहेर आला आणि क्रूर हत्येचा उलगडा झाला. (Latest Marathi News)

सचिन माम्हाने असे मयत मालकाचे नाव असून या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी सुनील मौर्या या नोकरासह त्याचे साथीदार शुभम गुप्ता ,अभिषेक मिश्रा यांना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा परिसरात सचिन म्हामाने यांच्या पत्नीचे इन्व्हर्टर आणि इलेक्ट्रिक चे दुकान आहे.

७ एप्रिलला सचिन कामानिमित्त बाहेर गेले ते घरी परतले नाही. सचिन यांच्या कुटुंबीयांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पोलीस देखील त्यांचा शोध होते. दरम्यान, बदलापूर दहागाव रोडवर सचिन यांची गाडी तोडफोड केलेल्या अवस्थेत आढळली. या गाडीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

पोलिसांनी आजुबाजुला शोध घेतला असता, सचिन यांचा मृतदेह दहागाव येथील निर्जनस्थळी पुरलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी (Police) मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असता, सचिन यांची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याचं समोर आलं. मात्र, त्यांची हत्या कुणी व का केली? याचा उलगडा करत आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. (Breaking Marathi News)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर व गुन्हे प्रगतीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंगटे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी चौकशी सुरू केली असता तपासादरम्यान दुकानात काम करत असलेला सुनील मौर्या याने त्याचे साथीदार अभिषेक मिश्रा व शुभम गुप्ता यांच्या मदतीने हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ या तिघांचा माग काढत तिघांनाही बेड्या ठोकल्या.

सचिन यांची हत्या का आणि कशी केली?

सचिन यांच्या या दुकानात सुनील मौर्य हा काम करत होता. सायंकाळच्या सुमारास सचिन यांची पत्नी दुकानात येत असे सुनील आपल्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहतो, असा संशय सचिन यांना होता. याच संशयातून सचिन सातत्याने सुनील वर चिडत असत कामावरून काढून टाकण्याची धमकी देत असत.

त्यामुळे सुनील संतापला होता. अखेर सुनीलने सचिन यांचा काटा (Crime News) काढण्याचं ठरवलं. यासाठी त्याने आपले दोन मित्र शुभम गुप्ता,अभिषेक मिश्रा यांची मदत घेतली. तिघांनी सचिन यांना टिटवाळा जवळ असलेल्या दहागाव येथे एका फॉर्म हाऊस मध्ये इन्व्हर्टर आणि इलेक्ट्रिक चे काम करायचे आहे, असा बहाणा करत त्यांच्याच गाडीतून दहगाव येथे घेवून आले.

जंगलात पोहचताच सुनीलने डाव साधला. सुनील आणि त्याच्या दोन साथीदारांनी सचिन यांना मारहाण केली. त्यानंतर ओढणीने गळा आवळून त्यांचा खून केला. हत्येनंतर कुणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपींनी मृतदेह जमिनीत पुरला. सोबत पाला पाचोळा मेलेल्या म्हशीचे अवशेष पुरले. मात्र, दोन दिवसांनी मृतदेह फुगल्याने त्याचा हात बाहेर आला आणि आरोपींच्या गुन्ह्याचा भंडाफोड झाला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT