Kalyan News  Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : ज्ञानेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लांबवली; कल्याणमधील घटना

Kalyan News : कल्याणच्या पश्चिमेकडील आग्रा रोड परिसरात असलेल्या ज्ञानेश्वर मंदिरातील दानपेटीसह रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: चोरट्यांनी आता मंदिरातील दानपेट्या लक्ष केल्या आहेत. दानपेट्या फोडून भाविकांनी त्यात टाकलेली रक्कम लांबविल्याचेे प्रकार होत आहेत. असाच प्रकार (Kalyan) कल्याण पश्चिमेकडे आग्रा रोड परिसरात असलेल्या ज्ञानेश्वर मंदिरात घडला असून या मंदिरातील दानपेटी फोडून (Crime News) रोकड लांबविली आहे. (Breaking Marathi News)

कल्याणच्या पश्चिमेकडील आग्रा रोड परिसरात असलेल्या ज्ञानेश्वर मंदिरातील दानपेटीसह रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. काही महिन्यांपूर्वी याच मंदिरात चोरी झाली होती. या मंदिरात आज पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या बाहेरील लोखंडी दरवाजावरील जाळी बाजूला काढून लोखंडी दरवाजातील एक गज काढला. यानंतर मंदिराच्या आतील कडी उघडून मंदिरासमोर असणारी दानपेटी फोडून (Theft) पैसे चोरले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्ञानेश्वर मंदिरात मागील काही दिवसात ही दुसऱ्यांदा चोरीची घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास झालेल्या चोरीबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे शोध घेण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यावर बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणी कारवाई

Face Care: चेहरा धुतल्यानंतर २ मिनिटांच्या आत करा हे काम; मेकअपशिवायही ग्लो करेल चेहरा

तुकाराम मुंढे यांचा शाळांसाठी नवा आदेश; शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी FDAची नवी नियमावली

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

SCROLL FOR NEXT