Shahada Accident : वळण रस्त्यावर कारचा अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Shahada News : शहाद्याकडे येत असताना रात्री दहाच्या सुमारास असलोद येथील औटपोस्ट समोरील वळण रस्त्यावर भरधाव कार रस्त्याच्या कडेला आदळली
Shahada Accident
Shahada AccidentSaam tv

शहादा (नंदुरबार) : कार्यक्रम आटोपून रात्रीच्या सुमारास घरी परतताना वळण रस्त्यावर कार रस्त्याच्या कडेला (Nandurbar) झाडावर आदळली. या अपघातात एका जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एकजण जखमी झाला आहे. हा अपघात (Accident) असलोद (ता. शहादा) गावालगत वळण रस्त्यावर झाला. (Maharashtra News)

Shahada Accident
Nandurbar News : नजर चुकवून मोबाईल व एटीएमचा वापर; महिलेची १ लाख ७१ हजारात फसवणूक

शहादा (Shahada) येथील नायब तहसीलदार विजय दयाराम साळवे कारने महसूल विभागातील मंडळ अधिकारी शिरीष परदेशी व अव्वल कारकून प्रदीप नथ्थू पाटील (दोन्ही रा. शहादा) यांच्यासोबत असलोद येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून शहाद्याकडे येत असताना रात्री दहाच्या सुमारास असलोद येथील औटपोस्ट समोरील वळण रस्त्यावर भरधाव कार रस्त्याच्या कडेला आदळली. या घटनेत प्रदीप नथ्थू पाटील (वय ५५, रा. शहादा) यांचा मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shahada Accident
Sushma Andhare News : नारायण राणे मानसिकरित्या आजारी, उपचार घेऊन लवकर बरे व्हावे; सुषमा अंधारे यांचा नारायण राणेंवर निशाणा

तर या अपघातात वाहनचालक श्री. साळवे व मंडळ अधिकारी शिरीष परदेशी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले.
या संदर्भात मंडळ अधिकारी शिरीष परदेशी यांनी शहादा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार वाहनचालक नायब तहसीलदार विजय साळवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com