Ambedkar Jayanti 2024: कल्याणमध्ये भीम जयंतीचा जल्लोष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लोटला जनसागर

Dr. Babasaheb Ambedkar jayanti: कल्याण पूर्व येथील पालिकेचा ड प्रभाग कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकावर रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
Ambedkar Jayanti 2024
Ambedkar Jayanti 2024Saam Tv

Dr. Babasaheb Ambedkar jayanti:

>> अभिजित देशमुख

कल्याण पूर्व येथील पालिकेचा ड प्रभाग कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकावर रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी हजारो नागरिक, अनुयायांसह खासदार डॉ श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी जमलेल्या समुदायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण पूर्व येथील लाखो नागरिकांची कल्याण पूर्वेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक व्हावे, अशी मागणी होती. येथील अनुयायी जनता गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. कल्याण पूर्वेत आता भव्य स्मारक उभारण्यात आले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्ण देखील उभारण्यात आलाय.

Ambedkar Jayanti 2024
Explainer: उद्धव ठाकरे गट आणि भाजपचा ग्राऊंडवर थेट सामना कमी? नेमकं कारण काय?

ते म्हणाले, कल्याण पूर्व येथील जनतेला आज या ठिकाणी जयंती साजरी करता येते. याचा मला समाधान आहे. लवकरच स्मारकाचे काम पूर्ण होईल व स्मारकामधील नॉलेज सेंटरच्या माध्यमातून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची आयुष्याची माहिती विद्यार्थी तरुण नागरिकांना नागरिकाना मिळणार आहे.

Ambedkar Jayanti 2024
Maharashtra Politics: पवारांचा डाव, भाजपला घाव! 3 बडे नेते 'शिवरत्न'वर एकत्र येणार; माढ्यासह सोलापूरचं समीकरण बदलणार?

ठाणे जिल्ह्यातील पहिले भव्य स्मारक असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी तुम्ही सगळ्यांनी मिळून बांधलय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे गाणं देखील गायलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com