Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : डिलिव्हरी बॉय, पण काम भयंकर, व्हिडिओ बघून सर्वच हैराण; CCTV पाहा

Kalyan News : कल्याणचा महात्मा फुले पोलिसांनी या सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. कुणाल साबळे असे या चोरट्याचे नाव आहे.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: एका खाजगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असतात शहरात दुचाकी चोरी करण्याचे काम एका तरुणांकडून सुरु होते. दरम्यान एक दुचाकी चोरी करत असताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असता हा चोरटा पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी दोन दुचाकी व एक रिक्षा हस्तगत केली आहे. 

कल्याणचा (Kalyan) महात्मा फुले पोलिसांनी या सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. कुणाल साबळे असे या चोरट्याचे नाव आहे. कुणाल हा एका खाजगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करायचा. मात्र त्याचा खरा धंदा गाडी चोरण्याचा होता. गणेशोत्सव दरम्यान पोलीस बंदोबस्तात असल्याची संधी साधत कुणालने दुचाकी, रिक्षा चोरण्याचा सपाटा लावला. या प्रकरणी पोलिसात (Police) तक्रार दाखल झाली असता पोलिसांकडून तपास सुरु होता. 

दरम्यान या तपासादरम्यान कल्याण पश्चिमेतील एका नामांकित हॉटेल समोर पार्क केलेली बाईक चोरतानाचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला आणि कुणाल पोलिसांच्या जाळ्यात सापडला. कल्याण पूर्व येथील चक्की नाका परिसरात राहणारा कुणाल याने याआधी देखील गाड्या चोरी केल्याचा संशय पोलिसाना असून महात्मा फुले पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT